Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०२, २०२२

९ एप्रिलपासून कौन बनेगा करोडपती रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार | Registration for Kaun Banega Crorepati



अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम म्हणजेच ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC). येत्या काही महिन्यात ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्यान व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सोनी टेलिव्हिजन वाहिनीने या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची नुकतीच घोषणा केली आहे. येत्या 9 एप्रिलपासून या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे. मग रात्री 9 वाजता नक्की वेळ काढून ठेवा.Registration for Kaun Banega Crorepati will start from April 9



या कार्यक्रमाच्या 14 पर्वाचे होस्ट बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. नुकतेच सोनी टेलिव्हीजन वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या 14 व्या पर्वाचा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट केला. या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन दिसत आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खुद्द अमिताभ बच्चन प्रेक्षकांना प्रोत्साहन देत आहेत.


Registration for Kaun Banega Crorepati will start from April 9


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.