Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०२, २०२२

न्यूझीलंडच्या इलेक्ट्रॉन राॅकेट ब्लॅकस्कायचे तुकडे सिंदेवाहीत कोसळले




विदर्भ, मराठवाडा आणि खांदेशातील अनेक जिल्ह्यात दिसलेला आकाशातील प्रकाशाचा झोत म्हणजे कृत्रिम उपग्रहाचे तुकडे असावेत असा अंदाज. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात आकाशातून एक लोखंडी रिंग जळत खाली कोसळली. ८*८ ची गरम लोखंडी रिंग पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.



राज्यात विदर्भातील काही जिल्ह्यात उल्कासदृश्य वस्तू कोसळताना दिसली. वर्तुळाकार वस्तू चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी येथे कोसळली. सॅटेलाईटचा भाग असल्याचीही चर्चा आहे.

आकाशात दिसलेला लाल लोळ चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळला... लाडबोरी ग्रामपंचायत च्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत कोसळला.


धुळ्यासह नंदूरबार, जळगाव, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे



न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत, असा अंदाज आहे.
आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.






A Rocket Lab Electron launched another pair of imaging satellites for BlackSky April 2 as the company gears up to attempt recovery of the rocket’s first stage.

The Electron lifted off from Rocket Lab’s Launch Complex 1 in New Zealand at 8:41 a.m. Eastern. The rocket’s upper stage deployed a kick stage carrying two BlackSky satellites into orbit nearly 10 minutes later. The kick stage, after a burn of its Curie engine, released the satellites into a 430-kilometer orbit nearly an hour after liftoff.

The launch was the latest in a series of Electron launches of BlackSky satellites arranged by Spaceflight. That deal included launches of pairs of BlackSky satellites in November and December 2021 as well as a failed Electron launch in May 2021.

Rocket Lab said March 24 that the launch, the second Electron flight of the year, was previously scheduled for March but postponed by weather. Because of the delay of the launch, revenue from the launch would be recognized in its fiscal second quarter rather than its first. The company updated its revenue projection for the first quarter from $42–47 million to approximately $40 million.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.