"विवेक सिंधु" चा सार्थ निरूपण ग्रंथ आध्यात्मिक अनुभूती देणारा : नितीन गडकरी
वेलतूर बातमीदार/ शरद शहारे
मराठीभाषेचे आद्यकवी श्री. मुकुंदराज स्वामी रचित विवेकसिंधु ग्रंथाचे निरूपण सार्थ स्वरूप अत्यंत चिकित्सक आणि संशोधनातून ह.भ.प.ॲड दत्तात्रेय महाराज आंधळे यांनी उपलब्ध करून दिले आहे. विवेकसिंधु हा ग्रंथ आध्यात्मिक अनुभूती देणारा आणि महाराष्ट्र धर्म जागवणारा आहे, असे प्रशंसोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काढले.
नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील श्री क्षेत्र आंभोरा देवस्थानकडून आयोजित सार्थ विवेकसिंधु या ग्रंथाचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते ३ मार्च रोजी करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर ठवकर होते.सौ कांचन गडकरी याप्रसंगी ग्रंथ निरुपण निरूपणकार, लेखक परळीचे ह भ प ॲड. दत्तात्रय आंधळे महाराज, सौ.कांचन नितीन गडकरी,शिवराम थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपूरपासून साधारणपणे 80 कि मी अंतरावर श्री क्षेत्र अंभोरा हे देवस्थान आहे. श्री. मुकुंदराजस्वामी यांनी विवेक सिंधु ग्रंथ शके 1110 ( इ स. 1188 )मध्ये रचला आहे.विवेकसिंधुचे निर्मीतीस्थळाबाबतचा शोध यात आहे.मुकुंदराज एक शोध वाट समाधी संशोधनपर ग्रंथ यापूर्वी ज्यांनी लिहिला आहे ते ॲड. आंधळे यांच्याविषयीही मंत्री गडकरी यांनी गौरवोद्गार काढले. चिकित्सक आणि सत्यान्वेषी पध्दतीने विवेकसिंधू निरुपण् यात आल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
यावेळी आंभोरा देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे सचिव केशवराव वाडीभस्मे, प्रा. डाॅा रामेश्वर पाठेकर , कोषाध्यक्ष मदन खडसिंगे, सहसचिव कमलेश ठवकर, भास्कर भोंगाडे , बाबासाहेब तुमसरे, आदींसह मान्यवर, तसेच सभासद, प्रा. प्रसेनजीत गायकवाड, प्रा. मनोहर भालके आदिंची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक प्रा. डाॅा रामेश्वर पाठेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. सुरेश नखाते यांनी केले.