Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०४, २०२२

चंद्रपूर मनपाच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महाकाली प्रभागाचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदू नागरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 4 मार्च रोजी सकाळी घडली.

Nandu Nagarkar, a corporator of Mahakali ward of Chandrapur Municipal Corporation




नगरसेवक नंदू नागरकर हे दररोज सकाळी बगीच्यात फिरायला जात असतात. आझाद बगीचा परिसरात फिरल्यानंतर मित्रांसमवेत गप्पा केल्यावर ते घरी जायला निघाले.

रघुवंशी कॉम्प्लेक्स समोरील सार्वजनिक शौचालय जवळून ते आपल्या दुचाकीने घरी जात असताना सुसाट वाहन चालविणाऱ्या युवकाला नागरकर यांनी हटकले. तेव्हा तो मुलगा नागरकर यांच्याशी वाद घालू लागला, त्यानंतर त्या मुलाने आपल्या 2 मित्रांना बोलाविले व नागरकर यांची वाट अडवून सरळ मारहाण करायला लागले. नागरकर यांना खाली पाडत लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ते युवक तिथून पळून गेले. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी नागरकर यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. ओळख न व्हावी यासाठी त्या मारहाण करणाऱ्या युवकांनी स्वतःचा चेहरा कपड्याने झाकून ठेवला होता. चंद्रपूर शहरात दारू विक्री सुरू झाल्यापासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गोळीबार आणि मारहाणीच्या घटना दररोज घडू लागले आहेत दरम्यान येत्या महिन्यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे त्यातच विरोधी पक्ष सदस्य नंदू नागरकर यांना ही मारहाण झाल्या ने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

The incident took place on the morning of March 4 when Nandu Nagarkar, a corporator of Mahakali ward of Chandrapur Municipal Corporation and former chairman of Standing Committee, former city president of Congress, was attacked.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.