कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा कंत्राटी पद्धतीने स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिका-यांकडून अर्ज आमंत्रित
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, साथ उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा देणारे स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकारी यांची आवश्यकता आहे.
आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची कोविड-19 साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत, शासकीय, महापालिका तसेच नगरपालिका मधून सेवानिवृत्त झालेले, बाँड पूर्ण न झालेले व इतर परंतु आरोग्य सेवा देण्यास स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकारी(एमबीबीएस/बीएएमएस) यांची कंत्राटी पदे भरावयाची आहे.
भरण्यात येणारी कंत्राटी पदे:
फिजिशियनची 8 पदे,
अनेस्थेटिस्ट 8 पदे,
मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस) 28 पदे,
मेडिकल ऑफिसर (बीएएमएस) ची 28 पदे
भरावयाची असून कमाल वयोमर्यादा सर्व पदांसाठी 60 वर्षे आहे. तरी, इच्छुक उमेदवारांनी 28 जानेवारी 2022 रोजी सुट्ट्यांचे दिवस वगळून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच उमेदवारांनी https://chanda.nic.in
व https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en
या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्याप्रमाणे विहीत नमुन्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय,चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे.