Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जानेवारी २२, २०२२

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ज्येष्ठ गायिकेचं निधन


ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचं निधन

वयाच्या ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

संगीत रंगभूमीवर शोककळा




संगीत रंगभूमीवर ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७० व्या वर्षी पुण्यातील रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खराब होती. आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राण ज्योत मालवली. वडील जयराम आणि आई जयमाला शिलेदार यांच्याकडून किर्ती शिलेदार यांना कलेचा वारसा मिळाला होता.

२०१८ मध्ये त्यांनी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषवलं होतं. मराठी रंगभूमी सक्रीय ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

Senior singer #KirtiShiledar 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.