Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी ०६, २०२२

सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना #hansrajahir

 सिध्दबलीतील पूर्व कामगाराना प्रलंबित वेतन व रोजगार द्यावा; माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सूचना 



सिध्दबली कंपनीतील पूर्वीच्या 82 कामगारांचे वेतन व अन्य देय राशी तसेच त्यांना पूर्ववत नौकऱ्या  बहाल करण्याची सूचना माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला केली. 


हंसराज अहीर यांनी जिल्हा प्रशासन तसेच कंपनी अधिकाऱ्यांच्या चर्चेनुसार संबंधित कामगारांनी कामगार आयुक्तांच्या तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सर्व आवश्यक कागदपत्रे  सादर करुनही 10 वर्षापासून प्रकरण प्रलंबित असतांना या बाबतीत निर्णय झालेला नाही असे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर येत्या 13 जानेवारीला सर्व विषयांना घेवून कामगार आयुक्त, जिल्हा उद्योग केंद्र अधिकारी, वेकोलि प्रबंधन व  सिध्दबली कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी अहीर यांना या चर्चेप्रसंगी दिले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.