Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जानेवारी १०, २०२२

चंद्रपुरातील सर्व ज्येष्ठांनी बुस्टर डोस घ्यावा | महापौरांचे आवाहन

चंद्रपूर : लसीचे दोन डोस घेतलेले आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन कर्मचारी, तसेच 60 वर्ष व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना मात्रा घेतल्याच्या तारखेपासून नऊ महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असल्यास  10 जानेवारीपासून प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बूस्टर डोस देण्यात येत आहे.  चंद्रपुरातील सर्व ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. 





फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्ष व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींना कोरोना लसीचा तिसरा डोस देण्यात येणार आहे. यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने कोविन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तिसरा डोस देताना लसीकरण केंद्रावर कोणतेही प्रमाणपत्र जमा किंवा दाखवायची आवश्यकता नाही, फक्त अशा व्यक्तींनी त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरणाबाबत निर्णय घ्यावा, असे मनपाच्या वतीने कळवण्यात आले आहे. सर्व नागरिकांचे शासकीय केंद्रावर लसीकरण विनामूल्य होईल.

#Chandrapur #CMCC

सध्या कोव्हिड नियमावलीमुळे शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे सन २००७ किंवा त्यापूर्वी जन्मलेले सर्व १५ ते १७ वर्षापर्यंतचे विद्यार्थ्यांनी शहरातील कोव्हॅक्सीन लसीकरण केन्द्रांवर जाऊन लसीकरण करावे, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापनाने पूढाकार घेऊन आपल्या विद्यार्थ्यांकरीता आपल्या शाळेत लसीकरण व्हावे यासाठी त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क करावा व १०० टक्के पात्र विद्यार्थ्यांचे लसीकरण लवकरात-लवकर पूर्ण करावे, असे आवाहन  महापौरांनी केले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.