अवकाळी पावसामुळे सावली तालुक्यातील रबीचे नुकसान
सोमवारी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकाचे अतोनात नुकसान झाले. खरिप व रब्बी पिकांचे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी हवालदिल झालेला आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा, उडीद ,मुंग पिकाचे नुकसान नुकसान झाल्याचे शेतकरी नितीन कोलते यांनी सांगितले.
तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. येथे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान पीक महत्त्वाचे पीक असून २ महिन्याआधी देखील अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नितीन कोलते यांनी केली आहे.
#Saoli #Chandrapur nitin kolte