Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

कोरोनाचा नवा व्हेरिएंट : डोस पूर्ण झालेल्यानाच प्रवास करण्याची मुभा

 कोरोनाचा नवा व्हेरिएंट : देशात अलर्ट, महाराष्ट्र सरकारनेही लागू केले निर्बंध


काही देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला. या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत असून. आरोग्य यंत्रणा सुसज्ज आहे.नागरिकांनी  कोरोना प्रतिबंधक नियमपालन करून सजगता बाळगावी, तसेच अद्यापही लस न घेतलेल्या नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन महाराष्ट्र सरकारने केले आहे. आज झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी अधिकाऱ्यांकडून विविध प्रकारची माहिती घेतली. यामध्ये भारतात कोणते व्हेरिएंट आहेत? त्याबद्दल जाणून घेतलं. विदेशी पर्यटकांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात यावेत असंही म्हटलं आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला महाराष्ट्रापासून दूर ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरुन एकनाथ शिंदेंनी घेतली सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची तातडीची बैठक




आरोग्य विभागाच्या नियमावलीनुसार आता दोन्ही डोस पूर्ण झालेल्यानाच रेल्वे प्रमाणेच बससेवा, रिक्षाने प्रवास करण्याची मुभा असणार आहे. नियमांचं भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रिक्षा आणि टॅक्सीत विनामास्क आढळल्यास प्रवाशासह ड्रायव्हरलाही 500 रुपये दंड द्यावा लागेल. तसेच दुकानात ग्राहक विनामास्क सापडल्यास 500 रुपये दंड द्यावा लागेल. तर त्या दुकान मालकाला 10 हजार दंड द्यावा लागेल. तर मॉलमध्ये ग्राहकाने मास्क न घातल्यास त्याचा भुर्दंड हा मालकाला सोसावा लागणार आहे. मालकाला थेट 50 हजार रुपये द्यावे लागतील.  


भारतात सध्या या कोरोनाच्या नव्या 'ओमिक्रॉन' विषाणूचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण मागच्या लाटेत आपल्याला जोरदार तडाखा बसला होता. हा नवा विषाणू डेल्टापेक्षाही भयानक मानला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी यावेळी उशीर होऊ नये यासाठी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली. कॅबिनेट सचिव राजीव गौबा, आरोग्य सचिव राजेश भूषण नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.


अमेरिका, रशिया, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया यासारख्या अनेक देशांनी आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईटसवर बंदी घातलीय. न्यूयॉर्कमध्ये हेल्थ एमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. भारतातही तातडीनं फ्लाईटस बंदी लागू करण्यात यावी अशी मागणी मुंबईच्या महापौरांनी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.



कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद पडलेला व्यव्यहार सुरु झाला असतानाच ओमीक्रोन व्हेरिएंट (Coronavirus new variant Omicron) साऊथ आफ्रिकेत आढळला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने उद्या बैठक बोलावली आहे. त्यामुळे शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मात्र उद्या रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात सर्व विभागाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं. त्यामुळे शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला जाणार असल्याने शाळा उघडणी लांबणीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमीक्रोन व्हेरिएंट साऊथ आफ्रिकेत आढळला त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतात अजून या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला नाही.  महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. अशातच शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.