Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर २७, २०२१

देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत संविधानात :- खासदार बाळू धानोरकर @BaluDhanorkar

 देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत संविधानात :- खासदार बाळू धानोरकर

 

 चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाद्वारे संविधान सन्मान दिनाचे आयोजन



चंद्रपूर : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे. असे प्रतिपदान खासदार बाळू धानोरकर (BaluDhanorkar) यांनी केले. ते चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागाद्वारे संविधान सन्मान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शेकडो महिला व पुरुषांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यात आला. 


                        यावेळी चंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, जेष्ठ काँग्रेस नेत्या डॉ. रजनी हजारे,  प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, महिला प्रदेश सचिव नम्रता ठेमस्कर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष चित्रा डांगे, शहर महिला अध्यक्ष सुनीता अग्रवाल, जेष्ठ काँग्रेस नेते के. के. सिंग, नगरसेवक नंदू नागरकर, प्रदेश सचिव विजय नळे, महिला जिल्हा सेवादल अध्यक्ष स्वाती त्रिवेदी, इंटक अध्यक्ष प्रशांत भारती, नगरसेविका संगीता भोयर,  काँग्रेस शहर अध्यक्ष घुग्गुस राजू रेड्डी यांची उपस्थिती होती.  



या कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी अनुसूचित जाती विभागातर्फे अनुताई दहेगावकर, सुनील पाटील, पवन अगदारी, शालिनी भगत, सुयोग खोब्रागडे, छाया शेंडे यांनी केले. 



याप्रसंगी बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, नागरिकांना आपले हक्क व कर्तव्ये यांची पूर्णपणे जाणीव असावी. तसेच आपल्या संविधानाप्रति व लोकशाही मूल्यांच्या प्रति जागरूकता असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी  म्हंटले.  


काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या डॉ. रजनी हजारे याप्रसंगी म्हणाल्या कि, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्य,समता व बंधुता या त्रिसूत्रांचा अंगीकार केला. घटनेच्या माध्यमातून त्यांनी विविध भाषा,धर्म, पंथ, संस्कृती, परंपरा असलेल्या देशात विविधतेतून एकता प्रस्थापित करण्यावर भर दिला. शिकाल तर टिकाल हा मंत्र देऊन त्यांनी मागासवर्गीयांना शिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला. महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शिक्षणाची कास धरावी, असा मोलाचा सल्ला दिला. खरं तर, बाबासाहेब हे स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.  त्यामुळेच तुम्ही आम्ही महिला सर्वच क्षेत्रामध्ये दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यासह अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.