Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २६, २०२१

युपीत बसपाचा ब्राह्मण कार्ड....! |

 युपीत बसपाचा ब्राह्मण कार्ड....!

उत्तर प्रदेशाला निवडणुकीचे (uttar pradesh election) वेध लागलेत. काही महिन्यानंतर बिगूल वाजेल. त्या अगोदर बसपाने ब्राह्मण कार्ड फेकला. या चालीने खळबळ उडाली. दुसऱ्याच दिवशी योगी आदित्यनाथ भागेभागे अयोध्येत गेले. दिवसभर  मीडिया योगी अयोध्दा छिनने नही देंगें. असे भोंगे वाजवित बसले. तर तिकडे सपा नेते अखिलेश यादव  ब्राह्मण संमेलनांच्या तयारीस लागले. बसपाने संमेलना अगोदर एक बैठक घेतली. त्यात दोनशेवर प्रमुख ब्राह्मण नेत्यांनी हजेरी लावली. ही घटना अनेकांची झोप उडविणारी ठरली. लगेच सर्वच पक्षांत धावाधाव. बसपाचे 23 जुलैला ला ब्राह्मण संमेलन झाले.ते अयोध्देत. त्याला ' प्रबुध्द वर्ग सुरक्षा, सन्मान विचार गोष्टी 'नाव दिले. त्याला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद. यावरून  ब्राह्मण कार्डाची खेळी रंगणार असे दिसते. पश्चिम बंगालप्रमाणे ही निवडणूक गाजणार. भाजपच्या  जय श्रीराम विरोधात बसपाचा  जय सियाराम नारा असणार. सोबत जय परशुरामचा तडका. फरशा दिसेल.



मंदिर हम पुरा करेंगें.....

 बहुजन समाज पार्टीचे  सरचिटणीस सतिशचंद्र  मिश्रा यांनी अयोध्देतून  ब्राह्मण कार्ड फेकला. त्या संमेलनात ते गरजले. भाजप को केवल राम चाहिये. भगवान राम नही. सितामैय्या तो बिलकूल नही. सितामैय्या बिना राम नही. हम बचपन से कहते आये. जय सियाराम. अब कैसे छोड देगें. भाजपवालों को सिता छोडकर राम चाहिये. यह हम होने नही देंगें. या वाक्यांवर टाळ्यांचा गडगडाट . मी कनौज ब्राह्मण. राज्याचा महाअधिवक्ता होतो. माझे वडील मुख्य न्यायमूर्ती होते. वीस वर्षापासून बसपात आहे. अन् अखेरच्या श्वासापर्यंत राहणार. 2007 मध्ये हा प्रयोग केला. 86 ब्राह्मण उमेदवार दिले. 41 निवडून आले. आमदार झाले. बसपा बहुमताने सत्तेत आली.बहन मायावतीने 15 ब्राह्मण मंत्री बनविले. 35 महामंडळ अध्यक्ष केले. 15 एमएलसी. मुख्य सचिव, डीजीपी दिला.आणखी काय काय दिले. याचा पाढाच वाचला. सपा, भाजपाने असे भरभरून  कधीच दिले नाही. अयोध्देवर  कोट्यवधी खर्च केले असे योगी म्हणतात. ते कुठे गेले दिसत नाहीत. दोनशे कोटीत अयोध्दा चकाचक दिसली असती. बसपाच्या काळात दीड वर्षात मोठमोठे स्मारक झाले. भाजपवाल्यांनी रामाला टेंन्टमध्ये ठेवले.अगोदर एक छोटा मंदिर बनवून त्यामध्ये ठेवले असते.अद्याप पाया झाला नाही.ही दिखाऊ आस्था. बसपाला सत्ता सोपवा. आम्ही राम मंदिराचे काम वर्षभरात पूर्ण करु. एक दिवसा अगोदर सतिशचंद्र मिश्रा आणि सहकाऱ्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. आरती केली. दर्शनाचे परमीट वाटणारे भाजपवाले कोण..! आम्हाला  दर्शनासाठी भाजपच्या परवान्याची गरज नाही. त्यांच्यासोबत बसपाचे माजी कॅबिनेट मंत्री नकूल दुबे ,अनंत मिश्रा, कुशल तिवारी, रतिनाथ मिश्रा होते.


विठूरचा विकास........

 मिश्रा यांचे भाषण आणखी पुढे सरकते.  विकासाकडे वळले. ते म्हणाले, सितामैय्या ह्या विठूरला राहिल्या होत्या. लव-कुश जन्मले. रसोई आहे. वाल्मिकी आश्रम आहे. त्या विठूरचा चेहरामोहरा बसपाने बदलला. नागरिकांना सुखसोयी दिल्या. रस्ते बांधले. दोनशे कोटी खर्च केले. वृंदावनचा उल्लेख केला. 500 कोटी खर्च केले. सिव्हरेज लाईन बदलली. नवी टाकली. पाण्याची लाईन टाकली. दवाखाना, वीज घर बांधले.13 किलोमीटर परिक्रमा बांधली. राज्यात अनेक मंदिरांवर अवैध कब्जा आहे. ती सर्व मंदिरं आम्ही खुली करु .परसो हम अयोध्दा गये. आज  घबराकर योगी गये.  ब्राह्मणों के पाव धोये. सपाने पुराने पाच ब्राह्मण नेताओं को बुलाया. सपा,भाजप के करणी व कथनी में अंतर है.योगी यांनी तीन मंत्री केले. त्यांना बदलणार होते.आमच्या संमेलनामुळे ते पक्के झाले. आणखी दोघातिघांना घ्यावे लागेल. बसपा बोलत नाही.केलेल्या कामाचे भांडवल करीत फिरत नाही. अगोदर करुन दाखविते.2007 तुम्ही बघितलं.आता 2022 बघाच. बसपाने हाथी नही,गणेश है. ब्रह्मा,विष्णू, महेश है. हा नारा दिला होता. 13 टक्के ब्राह्मण आहेत. सर्वानी सोबत यावे. योगी सरकारच्या काळात सर्वच दु:खी आहेत. दलित-ब्राह्मणांचा त्रास वाढला. जात विचारून मारले जाते. 40 वर ब्राह्मण तरूण जेलमध्ये आहेत. अनेकांना मारले.घरातून नेवून मारले जाते. गाडी उलटवली जाते. विकास दुबेच्या पुतण्याची बायको खुषी दुबे. ती केवळ 17 वर्षाची . 29 ला लग्न.30 ला लग्नाचा पहिला दिवस. पतीला चकमक दाखवून मारले. दोन तारखेला खुषीला अटक केली. जमानत मिळू दिली नाही. ती पोरगी वर्षभरापासून जेल भोगत आहे. काय तिचा दोष. तिची केस बसपा लढेल. तिला सोडवू. दुसऱ्या एका प्रकरणात आईसोबत दोन लहान मुलें जेलमध्ये दिवस काढत आहेत.अशा भावनिक घटना सांगत. पुढे संविधानावर येतात. डॉ.बाबासाहबने संविधान लिखा. इसलिये हम सब सुरक्षित है.नही तो यह सरकारने हम सबको जेल में ठुसा होता असे म्हणत ब्राह्मण समाजाचे गुण वैशिष्टे सांगत भाषण संपवितात.


बसपाचे नेते सांगतात. बहन मायावतीच्या राज्यात कायदा व सुव्यस्था चांगली होती. ही युपीची जनता कबुल करते.आज महिला, मुलें सुरक्षित नाहीत.कोरोनात किती बळी गेले. योगीने लपविले.गंगेने सर्व आकडे उघड केले. सावळागोंधळ माजला आहे. लुटीचे राज्य आहे. बसपाचे माजी मंत्री श्यामसिंह यादव सांगतात. योगी जाण्यात सर्वाची भलाई आहे.दलित- ब्राह्मण एकत्र आणू. ओबीसी, अल्पसंख्याकांनाही जोडू. सत्ता आणू सर्वजण हिताय कार्यक्रम राबवू.माजी मंत्री श्यामसिंह यादव हे प्रख्यात शुटर आहेत.माजी मंत्री राज्यवर्धन राठोड यांना शुटींगचे धडे दिले.  ते  म्हणतात. या आघाडीवर वर्षभरापासून काम चालू आहे. संमेलनं आता सुरु झाली. 2007 ची पुनरावृत्ती होणार असं बसपाला वाटते. हे राजकीय समर आहे. ही गर्दी मतदानापर्यंत टिकेल.मतदानात परिवर्तित होईल की विरेल.हा चर्चेचा विषय आहे. बिहारात लोजपा आटली. महाराष्ट्रात वंचित खपली. बसपाकडे जयभीम कॅडर आहे.तो कडवा व कट्टर आहे. 22 प्लस 13 असं बरजेचे गणित आहे.2007 मध्ये मतांचे आदानप्रदान बरोबर झाले.आता योगीला विरोध आहे. हा विरोध भाजप- संघाच्या विरोधात टिकला तर तारेल. या फार्मुल्यात मुस्लिम आधार सटकला.तर महागात पडेल. तेल अन् तुपालाही बसपा मुकेल. सोशल इंजिनिअरिंगचे धाडस बसपा किती पेलवेल. ते निकालानंतर कळेल.मात्र बसपाच्या या  खेळीने  ब्राह्मण वर्गासाठी सुगीचे दिवस आहेत.उत्तर प्रदेशात जातीय कार्डांचा भरमार खेला आहे.

  राजभर वेगळा दम भरतो.तर विकास पार्टी चार टक्के बळावर जोर आजमाईस करीत आहे. निवडणुकीच्या तोंडावर फुलनदेवींचे गावोंगावी पुतळे बसविण्यास निघाले. त्यांना योगी पोलिस आडकाठी करीत आहे. राजकारण हळुहलु तापत आहे.

-भूपेंद्र गणवीर

.................    BG...............


पेज नेव्हिगेशन



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.