*दारू दुकानातून होत आहे ठोक दारूची विक्री.
शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी)
- राज्यात वेळेनुसार संचारबंदी असताना नियमाला बगल मारून येथील देशी व विदेशी दारू विक्रेते आपली देन वाढवण्यासाठी अवैध दारू विक्रेत्याला हाताशी धरून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री करीत आहे. जिल्ह्यातील दारूबंदी हटताच शहरातील काही देशी व विदेशी दारू विक्रीची दुकाने सुरू झाली आहे . गेल्या सहा वर्षा पासून सुरु असलेलेली अवैध दारू विक्रीला चाप बसणार असे वाटत होते मात्र शासनाने परवानाधारक दारूविक्री ला दिलेल्या नियमानुसार पहाटे सात ते दुपारी चार नंतर दारू विक्रीला तसेच शनिवार आणि रविवार ला बंदी आहे. हे दूकाने बंद होताच हेच कारण समोर ठेवून अवैध दारू विक्रेत्यांनी येथील देशी व विदेशी दारू विक्रेत्याची संबंध साधून संचार बंदी च्या काळात परवानाधारक बार प्रमाणे आपली दारू विक्रीचे गुथे चालू केले आहे तसेच बनावट दारूची विक्री सुध्दा मोठया प्रमाणात केली जात आरे . या अवैध दारू विक्रेत्यांनी परवानाधारक दारू विक्रेत्याशी साठ गाठ साधून दररोज आलेल्या दारूच्या पेट्या बिनधास्तपणे आपल्या गुत्त्यावर पोहोचविल्या जात आहे तसेच तालुक्यातील चंदनखेडा, घोडपेठ या सह इतर ग्रामीान भागात दारु पोहचविने चालू केले आहे. शहरात सुद्धा चोवीस तास अवैध दारू मुबलक झाली आहे. या प्रकाराकडे स्थानिक पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रामाणिक दारू व्यवसायकांकडून बोलले जात आहे .
[गेल्या काही दिवसानपूर्वी परवानाधारक दारू विक्रेत्यांची बैठक झाली त्या बैठकीत अवैध दारू विक्रेत्यांना दारू द्यायची नाही असे ठरवण्यात आले तसेच याबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार सुद्धा करण्यात आली मात्र या प्रकाराला न जुमानता बंदीच्या वेळेत बिनधास्त अवैध दारू विक्री सुरू आहे ]
[कांतीलाल उपाय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र. 19 जुलै 2019 परिपत्रक क्रमांक 11020 /130 नुसार त्यांनी विभागीय अधीक्षकांना सूचना केल्या कोव्हीड-19 मुंडे वेळोवेळी मद्यविक्री दुकाने बदल केल्याने अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री होत आहे त्या दारू विक्रीला कायमस्वरूपी बंद करावी बंद न झाल्यास कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अवैध दारू विक्री बाबत विशेष मोहीम राबवून पोलिसांच्या मदतीने कारवाही करावी.]