Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै २४, २०२१

विद्यार्थी उठाबशा प्रकरणात शिक्षक दोषी कसे? |

- मनसे शिक्षक सेनेचा सवाल


नागपूर- दि.24/07/21

पंचायत समिती, भिवापूर अंतर्गत जिल्हा परिषद उ प्रा शाळा, महालगाव येथील  विद्यार्थी नऊ वर्षीय मुलीला ग्राम पंचायत कमेटी तर्फे नियुक्त केलेल्या कोकाटे नामक स्वयंसेवी महिलेने उठाबशा काढायला लावून छडीने मारहाण केल्याच्या पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकासह एका शिक्षकांवर  गुन्हा दाखल करण्याचा पोलीस कारवाईचा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेने तर्फे तीव्र निषेध करण्यात येत आहे.

Nagpur Bhiwapur ZP School

चिमुकल्या मुलीला झालेल्या मारहाणीचे संघटना अजिबात समर्थन करीत नसून प्रत्यक्षात या घटनेत मुख्याध्यापक किंवा शिक्षक यांचा अजिबात सबंध दिसून येत नसतांना सुद्धा पोलिसांनी मुख्याध्यापक व एका शिक्षकांवर गुन्हा दाखल करणे नियमबाह्य असल्याचे नमूद करून  शिक्षण विभागाच्या चौकशीचा अहवाल न मागताच थेट मुख्याध्यापक व शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांची घाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याचा आरोप मनसे जनहित कक्षाचे प्रभारी महेश जोशी यांनी केला आहे.

सदर घटना 6 जुलै रोजी घडली असतांना तब्बल 14 दिवसांनी पालकांनी तक्रार करणे, स्वतः तक्रारकर्ता पालक शाळा व्यवस्थापन समितीचा पदाधिकारी असणे व ज्या ग्राम पंचायत कमिटीने ठराव घेऊन महिला स्वयंसेविकेची नियुक्ती केली त्यांच्यावर काहीच कारवाई न करता शिक्षकांना दोषी ठरवल्यामुळे सदर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असावा अशी शंका येत आहे.


शिक्षण विभागाच्या चौकशी शिवाय दाखल केलेले गुन्हे रद्दबातल करून जिप स्तरावरून उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेत्तर सेनेचे राज्य सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष शरद भांडारकर, विदर्भ चिटणीस संजय चामट, जिल्हा सचिव मनोज घोडके,  भिवापूर तालुक्याचे पदाधिकारी हरिश्चंद्र दहाघाणे, श्रीराम वाघे यांनी केली आहे.



Nagpur Bhiwapur ZP School

संबंधित शोध


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.