थोरांचा आदर्श ठेवूनच, जीवनाचे साफल्य - सोनाली देशमुख
ताडगाव येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि. 23 जुलै:-
आपले प्रथम आदर्श जन्मदाते मातापिता असतात. आपल्या सानिध्यात जे-जे येतात, त्यांचा आदर करा. सूसंस्कारा बरोबरच ज्ञानार्जन करून उज्वल भविष्य करणार्या गुरुजनांना आदराचे स्थान द्या.थोरांचा आदर्श जीवनाला कलाटणी देतो. तोच आदर्श जीवनाचे मंगलमय साफल्य करीत असतो. असे प्रतिपादन सिद्धिविनायक पब्लिक स्कूल च्या संचालिका सोनाली देशमुख यांनी केले आहे. आज 23 जुलै रोजी ताडगाव येथील सिद्धिविनायक पब्लिक स्कूल येथे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवा प्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
यावेळी प्राचार्य दुर्योधन बगमारे, सहाय्यक शिक्षक दमाहे अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम शारदा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या गुरुपौर्णिमा उत्साहात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी शारदा स्तवन गायले. विद्यार्थ्यांचे प्रबोधन करताना सोनाली देशमुख पुढे म्हणाल्या की, जीवनाच्या सारीपाटात जगत असताना जे-जे आयुष्यात येतात, अशा लहान थोरांना गुरु म्हणून त्यांना आदराचे, सन्मानाचे स्थान द्या. असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. दमाहे यांनी गुरूपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश देसाई यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका शोभा ठाकूर यांनी मानले.
Siddhivinayak #Public #School #Gurupournima #celebration