चंद्रपूर/अमित तेलंग:
संचारबंदीत जर तुम्ही विनाकारण चंद्रपूरचा रस्त्यांवर फिरत असाल तर तुम्हाला कोरोना चाचणी मोफत करून मिळणार आहे.कारण चंद्रपूर पोलिसांकडून आता रस्त्यांवर विनाकारण करणाऱ्यांची मोफत अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपुरात सोमवारी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. या उपक्रमात एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 69 लोकांची चाचणी करण्यात आली त्यामध्येही 16 जण पॉझिटिव्ह आधळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चंद्रपूर शहरातील विविध भागात पोलिसांनी नाकेबंदी करत रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांची अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला असून चंद्रपुरातील कस्तुरबा चौक आणि शहरातील लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात पोलिसांकडून नाकेबंदी करण्यात आली आणि या ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.
टेस्ट नंतर पॉझिटिव आलेल्या या 17 जणांना विलगीकरनात ठेवण्यात आले. संचारबंदी लागू झाल्यानंतर देखील लोकांकडून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने पोलिसांना आता हे कठोर पाऊल उचलावे लागले आहे.
त्यामुळे जर तुम्ही चंद्रपुरात विनाकारण फिरत असाल तर तुमची कोरोना चाचणीही मोफत होऊन पॉझिटिव आढळल्यास तुम्हाला उपचारासाठी विलगीकरण आत जावे लागणार आहे.