५ लाख ३९ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त
एक आरोपी ताब्यात तर एक फरार
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
ऑपरेशन वॉश आउट अभियान अंतर्गत पोलीस स्टेशन एमआयडीसी हद्दीतील फरार आरोपी,निगराणी बदमाश,अवैध धंदयाविरोधात कार्यवाही करण्यासाठी नेमलेल्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलीसानी धाड घातली असता अवैध दारू साठा जप्त करण्यात येऊन एका आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
प्राप्त पोलीस माहिती सूत्रानुसार नियुक्त पोलीस पथकाला वायसीसी कॉलेजसमोर साई नगर येथील लाभलक्ष्मी अपार्टमेंट येथे आरोपी आकाश बंडू झाडे वय २४ वर्ष रा . प्लॉट नंबर ४९ आदर्श कॉलनी वानाडोंगरी व दादू उर्फ दिव्यांशु बंडू झाडे वय २३ वर्ष रा . आदर्श कॉलनी वानाडोंगरी हे दोघेही देशी दारूची अवैध विक्री करण्यासाठी शुक्रवार ९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सदनिकेतील बेसमेंट मध्ये ठेवलेल्या दारूच्या पेट्या स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम . एच .४४ बी ४४४४ मध्ये भरत असताना पोलिसांनी धाड टाकली असता देशी दारू संत्रा प्रीमियम सुपर ब्रँडच्या ६६ पेट्या,देशी दारू भिंगरी संत्रा १२ पेटी,देशी दारू संत्रा गोवा ब्रँड ४ पेटी,स्कॉर्पिओ गाडी,मोपेड असा एकूण ५ लाख ३९ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाला घटनास्थळावरून जप्त करून आरोपी आकाश यास पोलीसानी ताब्यात घेतले तर आरोपी दिव्यांशु याने घटनास्थळावरून फरार झाला.आरोपीकडे दारू बाळगण्याचा व वाहतूक करण्याचा कोणताही पुरावा नसल्याने आरोपी विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार सहा पोलीस आयुक्त दिलीप झलके, पोलीस उपआयुक्त नुरुल हसन,पी एम कार्यकर्ते यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक युवराज हांडे,सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश हत्तीगोटे, श्यामनारायण ठाकूर,शेख नौशाद फरार आरोपीचा शोध घेत पुढील तपास करीत आहे.