कोरोनाने घेतले ११ बळी, ५१८ पॉझेटिव्ह
यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाचे ११ बळी गेले असून, ५१८ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. ५०५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ६५ व ८३ वर्षीय पुरुष तसेच ८० व ९० वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील ४७ वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील ७२ व ७९ वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला, दिग्रस शहरातील ५८ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ५५ वर्षीय पुरुष आणि बाभुळगाव तालुक्यातील ७२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या ५१८8 जणांमध्ये ३४० पुरुष आणि १७८ महिला आहेत. यवतमाळ येथील १७९ पॉझेटिव्ह रुग्ण, वणी ६३, पांढरकवडा ४७, पुसद ३५, नेर २७, दिग्रस २५, राळेगाव २२, आर्णि २१, दारव्हा २१, घाटंजी १८, महागाव १८, मारेगाव १०, बाभुळगाव ८, झरीजामणी ७, उमरखेड २ आणि इतर शहरातील १५ रुग्ण आहे.
प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बंद
जिल्ह्यात कारोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक यवतमाळ शहर व तालुक्यात असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याकरीता उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडंट कमांडर यांना प्राधिकृत केले आहे. त्यानुसार यवतमाळ शहरातील व तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात प्रतिबंधित क्षेत्र मौजा खरद, शिवाजी नगर प्रभाग क्र.14, लोहारा येथे तीन ठिकाणी, जे.एन.पार्क, प्रभाग क्र.26 लोहारा, पोलिस मित्र कॉलोनी प्रभाग क्र.26, दत्तात्रय नगर प्रभा क्र.26 लोहारा, मीया नगरी, राधेनगरी प्रभाग क्र.26 लोहारा, जवाहर नगर प्रभाग क्र.14 लोहारा, जे.एन.पार्क प्रभाग क्र.13, वाघापूर ता. यवतमाळ तसेच देवी नगर, प्रभाग क्र. 26 येथे तीन ठिकाणे, मुंगसाजी नगर प्रभाग क्र.28, रेणूका नगर प्रभाग क्र.28, राजहंस सोसायटी प्रभाग क्र.28, रोहिणी सोसायटी प्रभाग क्र.28, महावीर नगर प्रभाग क्र.14, मौजा वरझरी येथे दोन ठिकाणी, मौजा सालोड, मौजा बोथबोडण या प्रस्तावित भागास प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सीमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश देण्यात येत आहे.