जंगलात लागलेला वणवा विझवतांना तीन वनमजुरांचा होरपळून मृत्यू , दोन मजूर गंभीर
संजीव बडोल प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.9 एप्रिल:-
दिनांक 8 एप्रिल रोज गुरुवारला नागझिरा व पिटेझरी या नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव च्या दोन वनपरिक्षेत्रांमध्ये अज्ञात इसमांनी सकाळी 11.30 च्या दरम्यान कक्ष क्र. 98,99,100, 97 येथे आग लावली होती.सदर आग विझविण्याचे काम 50-60 वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते . सायंकाळी 5 वाजे पर्यंत आग आटोक्यात आली होती. पण हवाधुंदिने पुन्हा आग लागली. आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले. लागलेली आग विझवण्याचे काम सुरू झाले. दरम्यान वणवा विझविण्याचे कार्य सुरू असताना, अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वनवा विझ विनारे पैकी दोन इसम आगीमुळे गंभीर जखमी झाले. तीन वन मजुरांचा जागीच होररपळुन मृत्यू झालेला आहे.मृतका मध्ये राकेश युवराज मडावी वय 40 वर्ष राहणार थाडेझरी,
रेखचद गोपीचंद राणे वय 45 वर्षे राहणार धानोरी, सचिन अशोक श्रीरंगे वय 27 राहणार कोसमतोंडी यांचा समावेश आहे.सदर घटना नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव मधील थाटरामारीचा सांधा या परिसरातील असल्याचे समजते.हे सर्व मृतक हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत होते . या आगीत विजय तीजाब मरस्कोले वय 40 वर्ष राहणार थाडेझरी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया, राजू शामराव सयाम वय 30 वर्ष राहणार बोळुदा जिल्हा गोंदिया यांचा समावेश आहे. साकोली येथील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची गंभीर अवस्था लक्षात घेता सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवलेले आहे.त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
मृतक हे सर्व मजूर हंगामी वनमजूर म्हणून कार्यरत होते .अशी माहिती
एम. रामानुजम, क्षेत्रीय संचालक व वनसंरक्षक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव यांनी दिली आहे.पिटेझरी व नागझिरा वनपरिक्षेत्रात 8 एप्रिलला गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास आग लागली होती. लागलेली आग विझविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यात तीन वन मजुरांचा होरपळून मृत्यू झाला. मात्र ही बाब वन्यजीव विभागाने पुढे येऊ दिली नाही. कोसमतोंडी येथील वन मजूर सचिन श्रीरंगे यांचा मृत्यू झाला. मात्र रात्री नऊ वाजता नंतर त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. हे वनमजुर आग विझवत असताना एकही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर नसल्याची माहिती आहे. फक्त त्या ठिकाणी वन मजुरच असल्याचे समजते.आज 9 एप्रिल शुक्रवारला क्षेत्रीय संचालक एम. रामानुजम यांनी प्रेस नोट जारी केली. साकोली व नवेगावबांध येथील अधिकाऱ्यांनी ही प्रेस नोट बातमीदारांना दिली. एरवी झालेल्या कार्यक्रमाचे वृत्त देखील विभाग बातमीदारांना पुरवत नाही. हे येथे उल्लेखनीय आहे. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी, थाटे झरी,बोळूंदा या गावातील आहेत या घटने चे तीव्र पडसाद या गावात उमटले आहेत वन्यजीव विभागांच्या अधिकाऱ्यांबाबत या गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गावात तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
--------------
ह्या प्रकरणात दोषी कुणीही असोत, पण वनविभागाच्या सेवेत कार्यरत असतांनी अग्नीत तीन वनमजुर मॄत्युमुखी पडल्यामुळे ,मृतक वन कामगारांच्या कुटूंबातील एकाला स्थाई नौकरी व 25 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली आहे . जखमीना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य व उपचार खर्च नवेगाव नागझिरा व्याघ्रप्रकल्पाने करावे .अशी मागणी निर्मलकुमार पंधरे,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कार्याध्यक्ष गोंदिया यांनी केली आहे.