Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २५, २०२१

चौकशीच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी मध्यरात्री सव्वा बाराला केलं ट्विट; काय म्हणतात वाचा


 पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महा विकास आघाडी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. गृहमंत्री  अनिल देशमुख यांच्या वरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती मार्फत समिती गठीत करण्याचा निर्णय आज रात्री उशिरा घेण्यात आला. मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. 

चौकशीच्या आदेशानंतर गृहमंत्र्यांनी ट्विट केलं ;मध्यरात्री सव्वा बाराला  काय म्हणतात वाचा>

मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, "दूध का दूध, पानी का पानी" करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन.

सत्यमेव जयते...

परमबीर सिंह द्वारा मुझपर लगाए गए आरापों की जांच करवाकर "दूध का दूध, पानी का पानी" करने कि मांग मैंने माननीय मुख्यमंत्री महोदय से करी थी। अगर वे जांच के आदेश देते हैं तो मै उसका स्वागत करूंगा।

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.