Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी २८, २०२१

शहरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी शिबीर

 शहरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी शिबीर



नागपूर, ता. २८ : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या नागपूर महानगरपालिका कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टींगवर भर देत आहे. याअंतर्गत रविवारी (ता. २८) शहरातील विविध ठिकाणी कोरोना चाचणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनअंतर्गत या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर झोन क्र. १ अंतर्गत असलेल्या ऑरबिटल टाऊनशीप, धरमपेठ झोन क्र. २ अंतर्गत असलेल्या क्रिष्णम्‌ नगरी, हनुमाननगर झोन क्र. ३ अंतर्गत असलेल्या शंकर नगर, धंतोली झोन क्र. ४ अंतर्गत असलेल्या गोदरेज आनंदम्‌ सिटी आणि बेलतरोडी पोलिस स्टेशन, नेहरूनगर झोन क्र. ५ अंतर्गत असलेल्या निर्मल नगरी, गांधीबाग झोन क्र. ६ अं!र्गत गणेशपेठ पोलिस स्टेशन, सतरंजीपुरा झोन क्र. ७ अंतर्गत शांतीनगर पोलिस स्टेशन, लकडगंज झोन क्र. ८ अंतर्गत सूर्य नगर, गंगाबाग, पारडी, आसीनगर झोन क्र. ९ अंतर्गत जरीपटका, कपिलनगर, कोराडी पोलिस स्टेशन आणि मंगळवारी झोन क्र. १० अंतर्गत पलोटी येथे कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या सर्व शिबिरांसाठी मनपाचे झोनल आरोग्य अधिकारी डॉ. भोयर, डॉ. भिवगडे, डॉ. शुभम मनगटे, डॉ. सागर नायडू, मनाली कायरकर, रोमल शेंडे, शिवानी पांडव, अर्शिया कुरेशी, जरीपटका पोलिस ठाण्याच्या ठाणेदार तृप्ती सोनवणे, पोलिस उपनिरिक्षक अंबोरे, पोलिस उपनिरीक्षक देशमुख, हेडकॉन्टेबल राजेश साखरे, कर्मचारी खातीब, सचिन बढिया, प्रदीप भैसे आदींचे सहकार्य लाभले. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.