कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्थानक तसेच गाडीत विशेष उपाय योजना
नियमित होते
मेट्रो ट्रेनची साफसफाई
नागपूर, २८ फेब्रुवारी : सुरक्षा मानकांचे
पालन करत, महा मेट्रोची प्रवासी सुरु असून कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर, प्रवाश्याचा प्रवास सुरक्षित असावा या करीता महा
मेट्रोच्या वतीने वेळो वेळी अनेक महत्वाच्या उपाय योजना केल्या जातात. ज्यामध्ये
प्रवाश्यांकरता मास्क घालणे बंधनकारक असून स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाश्याचे
तापमान तपासले जाते. तसेच प्रत्येक प्रवाश्याला सॅनिटायझर दिले जाते. मेट्रो गाडीत
प्रवेश करण्याआधी त्याने हात स्वच्छ करणे अपेक्षित आहे. मेट्रो गाडीत असलेल्या
सर्व प्रवासी उतरल्या नंतरच नव्याने प्रवास करत असलेल्या प्रवाश्यांना डब्यात
प्रवेश दिला जातो.
ट्रेन, स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण: सर्व मेट्रो ट्रेन
आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात येते. या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची
ठराविक वेळानंतर साफ-सफाई करण्यात येते. मेट्रोच्या कार डेपोमध्ये स्वयंचलित ट्रेन
वॉश प्लांट सिस्टम स्थापित केली गेली आहे आणि प्रवासी सेवेच्या आधी आणि नंतर दररोज
ट्रेन स्वच्छ करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. हा प्लांट ट्रेनच्या दोन्ही बाजू
तसेच अंतर्गत बोगी धुण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मेट्रो ट्रेन पीएलसी - प्रोग्राम
केलेले नियंत्रण पॅनेलद्वारे आपोआप धुतली जाते. कोणत्याही लांबीची ट्रेन कार्यक्षमतेने
धुण्यास हे उपकरणे सक्षम आहेत. हे आधुनिक वॉश प्लांट फोटो इलेक्ट्रिक सेन्सरने
सुसज्ज आहे जे पाणी आणि उर्जा वापर दोन्हीची बचत करण्यास मदत करते. हे मशीन अवघ्या
३ मिनिटांत पूर्ण ट्रेन सेट धुऊ शकते. वॉश प्लांट स्वयंचलित आहे. याव्यतिरिक्त, बोगीची योग्य देखभाल करण्यासाठी इनबिल्ट मॅन्युअल मोडचा
वापर देखील केला जाऊ शकतो. या वॉश प्लांटची स्वतःची रीसायकलिंग व्यवस्था आहे आणि
पाण्याच्या गुणवत्तेनुसार १००% पाणी पुनर्वापर करता येते. हा प्लांट आपत्कालीन
स्टॉप आणि वेग नियंत्रण यासारख्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे.