भामरागड :- चंद्रपुर-वणी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार मा. बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते लेखक डॉ. प्रा. कैलास निखाड़े यांचे "औद्योगिकरण व नागरीकरण" या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शेतीच्या विकासापेक्षा जर औद्योगिकीकरणाचा वेग जास्त असेल, तर त्यामुळे कच्चा माल व अन्नधान्य ह्यांचा पुरेसा पुरवठा न होऊन मूल्यवाढ, उत्पादनात खंड, परराष्ट्रीय व्यापारातील प्रतिकूल तफावत वगैरे संकटे तसेच अनेक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्माण होतात आणि विकासाच्या वेगालाच खीळ बसते, त्याचबरोबर शेतीच्या विकासासाठी औद्योगिकीकरण होणेही जरूर असते. शेतीकरिता अवजारे, खते व इतर साधनसामग्री ही उद्योगधंद्यांपासूनच उत्पादित होत असते. म्हणून शेतीबरोबरच उद्योगाचाही विकास झाला पाहिजे. शिवाय औद्योगिकीकरणामुळेच शेतीवर अवलंबून असलेल्या अनुत्पादक लोकसंख्येला औद्योगिक क्षेत्रात रोजगारी देता येणे शक्य होते.
या प्रसंगी प्रवीण भाऊ सुराणा जिल्हा प्रमुख विदर्भ लोकसेना, श्री. विलास नांदे उपस्थित होते
तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणारे प्रा. डॉ .कैलास निखाडे राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. ते गोडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भूगोल विषयांसाठी Ph.D. चे मार्गदर्शक आहे. Save Water ही संकल्पना साध्य करण्यसाठी जलदुत म्हणून कार्यकरीत आहे. तसेच श्री. विलास भाऊ नेरकर विधान सभा प्रमुख , श्री. मनीष भाऊ जेठानी युवा नेता जिल्हा चिटनीस, श्री. रमेश भाऊ मेश्राम उपजिल्हा प्रमुख आदिवासी नेता, श्री. पविन भाऊ धनवलकर अध्यक्ष वरोरा जिल्हा संघर्ष समिती, श्री. दिगंबर फालके , युवा नेता दिपक गोंडे , यांनी त्याचे अभिनंदन केले.