Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जानेवारी १२, २०२१

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी विजय वडेट्टीवार दिल्लीला रवाना





महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. यातच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळवण्यास उत्सुक असल्याची माहिती आहे. वडेट्टीवार यांची काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांच्यासोबत दिल्लीत बैठक झाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाबाबत विजय वडेट्टीवार आणि के सी वेणूगोपाल यांची राजधानीत खलबतं झाली. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे.

नाना पटोलेही शर्यतीत
दुसरीकडे, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.

मुंबईचा फॉर्म्युला वापरणार?

काँग्रेसमधील अनेक बडे नेते प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, प्रदेशाध्यक्षपदाची संधी एकाच नेत्याला मिळाल्यानंतर इतर नेते नाराज होण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसकडून आता ‘मुंबई मॉडेल’चा वापर करून या नेत्यांची समजूत काढली जाऊ शकते. या फॉर्म्युलानुसार प्रदेशाध्यक्ष न होऊ शकलेल्या नेत्यांकडे इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. तसेच प्रदेशाध्यक्षासह चार कार्यकारी अध्यक्ष नेमण्याची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.