Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर ०६, २०२०

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी सायकल राईड करून केले स्टेशन चे निरीक्षण



महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित सायकलसह मेट्रो ट्रेन मध्ये दाखल, केले मिहान डेपो चे निरीक्षण

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांचा सायकलसह मेट्रो ट्रेनने प्रवास,इतर अधिकाऱ्यांना केले प्रेरित

*नागपूर,०६ डिसेंबर:* महा मेट्रो तर्फे प्रवाश्यान करिता विविध सोई सुविधा मल्टी मॉडेल इंट्रिग्रेशन अंतर्गत उपलब्ध करण्यात येत असून मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा महा मेट्रोने सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे,या अनुषंगाने आज सकाळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी स्वतः मेट्रो सायकल ने मेट्रो स्टेशनची पाहणी केली. शंकर नगर चौक तसेच रचना जंक्शन मेट्रो स्टेशनची नुकतेच सीएमआरएस तर्फे पाहणी करण्यात आली असून सदर मेट्रो स्टेशन लवकरच नागरिकांन करिता खुले होण्याच्या मार्गावर आहे याच अनुषंगाने महा मेट्रोचे व्यवस्थापकीय डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी आज शंकर नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली व स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोई - सुविधाच आढावा घेत, समाधान व्यक्त करत केलेल्या कार्याची प्रशंसा डॉ. दीक्षित यांनी यावेळी केली. या व्यतिरिक्त डॉ. दीक्षित यांनी सिताबर्डी इंटरचेंज (ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिका),खापरी मेट्रो स्टेशन, मिहान डेपोची सायकलने प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले कि, नागरिकान करिता अतिशय उपयुक्त व सोईस्कर सेवा उपलबध करण्यात आली असून नागपूरकरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा आपल्या दैनंदिन प्रवासात सायकल वीथ मेट्रो किंवा मेट्रो सेवा सोबत फिडर सेवेचा उपयोग करून पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी नागपूरकरांना तसेच मेट्रो कर्मचाऱयांना केले. यावेळी कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक श्री. सुधाकर उराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात सायकलिस्ट असून जे दररोज सायकल ने प्रवास करून कॉलेज, ऑफिस तसेच इतर ठिकाणी ये जा करतात. सायकल मेट्रो मध्ये सोबत नेणे सोईस्कर झाले आहे. महा मेट्रो या अनोख्या प्रवास करता प्रवाश्याना आवाहन करते कि मेट्रो प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्याकरिता सहज पणे मेट्रो मध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे. मेट्रो कोच येथे सायकलिस्ट करता योग्य सूचना फलक तसेच सायकल ठेवण्याकरिता योग्य जागा नेमली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.