Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर ०८, २०२०

रस्त्याची कामे उत्तम दर्जाची व्हावीत

मंत्री विजय वडेट्टीवार : हायब्रीट अँन्यूटीअंतर्गत १६०० कोटींची कामे सुरू


गडचिरोली : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हायब्रीट अँन्यूटीअंतर्गत १६०० कोटींची कामे विविध कंत्राटदारांकडून सुरू आहेत. रस्त्यांच्या कामासंदर्भात  आढावा बैठक मंत्रालयात पार पडली. त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, मुख्य अभियंता  दशपुते, अधीक्षक अभियंता साखरवडे, गडचिरोलीचे अधीक्षक अभियंता गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, दोन्ही जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामे कंत्राटदाराने घेताना शासन बांधकाम विभाग नियमानुसार ६० टक्के आणि कंत्राटदार ४० टक्के असा नियम वापरून संबंधित कंत्राटदार यांना परवानगी देण्यात आलेली होती. तरी, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकाही कंत्राटदाराने  ४० टक्के  निधीची उभारणी  बँकेकडून कर्ज दाखवून केलेली नसून कंत्राटदाराने देखील स्वत:कडून निधीची उभारणी करून कामे पूर्ण केलेली नाहीत. तरी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण रस्त्यांच्या कामासंबंधितची बाब आपत्ती व मदत पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या निदर्शनास आणून ही कामे तातडीने पूर्ण करण्यासंबंधीतचे निर्देश दिले.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून रस्त्यांची दुरवस्था आहे. कंत्राटदार ४० टक्के निधीचा खर्च करीत नसून ही कामे  शासनाच्या ६० टक्के   निधीतूनच होत असल्याने कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तरी या रस्त्यांची कामे उत्तम दर्जाने, दिलेल्या कालावधीत तातडीने पूर्ण व्हावे, असे निर्देश विजय वडेट्टीवार यांनी बैठकी दरम्यान दिले. या बाबत पुढील कारवाईसाठी  संबंधित विभागाच्या अधिकाºयांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  निर्देश दिले असून तातडीने कामे पूर्ण होतील, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.