⭕ विस्मरणात @ गेलेला खेळ-लगोरी ⭕
फेसबुक लिंक https://bit.ly/3jIL2vT
लगोरी हा एक भारतातील पारंपरिक खेळ असून यास ‘लिंगोरचर’ असेही म्हणतात. संत एकनाथांच्या गाथेत या खेळाचा निर्देश आढळतो. या खेळात दोन संघ असतात.@ खेळाचा उद्देश म्हणजे यात असलेल्या लगो-या एकावर एक ठेवणे. त्या चेंडूने विस्कळीत करणे (म्हणजेच फोडणे) व परत विरुद्ध बाजूच्या संघाने ज्या चेंडूने लगोरी फोडली आहे, त्याच चेंडूने लगोरी रचणा-या संघास बाद करणे. असे बाद न होता जो संघ फोडलेली लगोरी अधिकवेळा लावील, तो संघ विजयी होतो.@
͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜
हा एक महाराष्ट्रीय खेळ आहे. हा खेळ खेळण्यास फार सोपा असून त्याबद्दल कांहीही खर्च करावा लागत नाही. या खेळामुळें अचुक नेम मारण्याचा चांगला सराव होतो. या खेळासाठी १८. २८ मी. ते ३०. ४८ मी (६० ते १०० फूट) व्यासाचे एक वर्तुळ आखून घेतात. त्याची परीघरेषा ही अंतिम मर्यादा मानतात.@ या मोठ्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ लगोरी ठेवण्यासाठी आखतात. लगोरी वर्तुळात रचावी लागते. गडयांच्या दोन बाजू कराव्या. प्रत्येक बाजूस ५ गडी असावेत. लगोरी फोडण्यासाठी तीन वेळा चेंडू मारण्याची संधी एक खेळाडुला मिळते. लगोरी फोडणारा लगोरीच्या एका बाजूला नेमक्षेत्रात व त्याचा लगोरी फोडता फोडता लगोरीकडून मागे जाणारा चेंडू अडविण्यासाठी एक क्षेत्ररक्षक मागे उभा असतो. इतर ४ क्षेत्ररक्षक आखलेल्या मोठ्या वर्तुळात लगोरी रचणा-या खेळाडूंचा विचार करून उभे केलेले असतात.@
͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜
सर्वांत खालची लगोरी ६ इंच व्यासाची असावी व कळसासह सर्व लगोर्यां ची उंची १ फूट असावी. लगोरी कळसाकडे निमुळती होत जावी. प्रत्येक लगोरी १ इंच जाड असावी व कळस ३ इंच उंच असावा. या खेळास घेतलेला चेंडू टेनिसच्या चेंडूएवढा कापडाचा असावा.
͜M͜a͜h͜i͜t͜i͜ ͜s͜e͜v͜a͜ ͜g͜r͜o͜u͜p͜ ͜p͜e͜t͜h͜v͜a͜d͜g͜a͜o͜n͜
लगोरी फोडणारा@ लगोरी फोडली की उडालेला वा पडलेला चेंडू लगोरी रचणा-या खेळाडूंपैकी एकानेच, एकदाच पायाने लाथाडायला परवानगी असते.@ त्याहीपेक्षा महत्त्वाचे, ते लगोरी लावणे. ज्यांनी लगोरी फोडली आहे, त्याच संघातील खेळाडूंनी लगो-या एकावर एक रचणे महत्त्वाचे असते.@ क्षेत्ररक्षकाचे अशा वेळी काम असते, लगोरी लावणा-यांपैकी एकाला चेंडू मारणे. असा चेंडू एकाला जरी लागला, तरी त्या संघास एक गुण मिळतो.@ प्रत्येक संघाच्या सर्व खेळाडूंना लगोरी फोडण्याची संधी मिळेपर्यंत खेळ चालतो. ज्या संघाच्या अधिक लगो-या होतात, म्हणजेच अधिक गुण होतात, तो संघ विजयी घोषित केला जातो.@