गडचिरोली : एकूण सक्रिय बाधितांमधील गुरुवारी (ता.८) १४६ जणांनी कोरोनावर मात केली तर आजही ११३ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा ९१९ झाला. आत्तापर्यंतची एकूण कोरोनाबाधित संख्या ३६८४ वर पोहचली आहे. यापैकी २६७६ जणांनी कोरोनावर मातही केली आहे. यानुसार ७३.९६ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सद्या जिल्ह्यात आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारी २५.४६ असून मृत्यूदर ०.५८ टक्के आहे.
जिल्ह्यात १४६ कोरोनामुक्त रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ७० अहेरी ७, आरमोरी ८, भामरागड ७ चामोर्शी ८, धानोरा १६, एटापल्ली ६, मुलचेरा २, कोरची ३, कुरखेडा ४ व वडसा येथील १५जणांचा समावेश आहे. तसेच नवीन ११३ बाधितांमध्ये गडचिरोली ६ अहेरी ९, चामोर्शी ५, आरमोरी २७, धानोरा ३१, एटापल्ली १९, कोरची २, कुरखेडा ४ व वडसा येथील १० जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६ बाधितांमध्ये मुरखळा १, साईनगर १, सोनापूर वसाहत १ व बाकी गडचिरोली शहरातील आहेत. अहेरी ९ मध्ये ८ स्थानिक तर १ गुरूजा अहेरी येथील आहे. आरमोरी २७ मध्ये डोंगरगाव १, गोगाव १, रामाला १, शिवनीभूज १व इतर सर्व शहरातील आहेत. चामोर्शी ५ मध्ये तळोधी मोकासा २, मकेपल्ली१, भेंडाळा २ व सोनापूर १ जणाचा समावेश आहे. धानोरा ३१ मध्ये कोसमटोला १, पोलिस स्टेशन चातगाव मधील १८ जण आहेत, गोधलवाही पोलिस स्टेशन मधील ३ जण आहेत व पोलिस स्टेशन कटेझरी च्या ९ जणांचा समावेश आहे. एटापल्ली १९ मध्ये बिद्री १, सिआरपीएफ ९, शहरातील ४, हेडरी पोलिस ४, नगरपंचायत १ व रेंगाटोला १जणाचा समावेश आहे. कोरची २ मध्ये बिहीटेकाळा १ व स्थानिक १ जणाचा समावेश आहे. कुरखेडा ४ मध्ये वाडेगाव १, सोनसरी १ व स्थानिक २ जणांचा समावेश आहे. वडसा १० मध्ये आमगाव १, गांधी वॉर्ड १, कोकडी २, कुरूड १, मधुवन कॉलनी ३, एसआरपीएफ १ व शहरातील इतर १ जणाचा समावेश आहे.