गङचिरोली/ प्रतिनिधी
तळोधी मोकासा उपसा सिंचन योजना आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सिंचनासाठी आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत या प्रकल्पावर कमी खर्च झाला आहे. या सिंचन प्रकल्पाची आवश्यकता पाहता तळोधी मोकासा उपसा सिंचन योजनेचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळास सादर न करता योजना चालू ठेवण्याच्या पुनर्विचारासाठी सचिव समितीकडे फेरसादर करण्यात यावा, अशी शिफारस नियामक मंडळाने करावी ही मागणी मंत्री श्री. @Jayant_R_Patil यांच्याकडे केली आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वङेट्टीवार यांनी दिली. या योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील १६ गावांत ६०६२ इतकी सिंचन क्षमता निर्माण होईल. यापैकी २२ गावे आदिवासीबहुल असून यामुळे आदिवासी, नक्षलग्रस्त आदिवासी जनतेचे राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे.
पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांसोबतच लहान व्यावसायिकांचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे .माल वाहून जाणे व लहान कच्ची दुकाने यांचे नुकसान झाल्यामुळे व्यावसायिक लोकांना सुद्धा याचा फटका बसला आहे . भविष्यात या प्रकारची परिस्थिती येऊ नये यासाठी योजना आखण्यात येईल.


