Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

प्रथम वर्ष प्रवेशाच्या वाढणार 30 टक्के जागा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची मागणी झाली मंजूर

B.Com, B.Sc, B.B.A, B.C.C.A, B.C.A

कुलगुरू यांनी केली रा.वि.काँ.ची मागणी त्वरित मंजूर




राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, विद्यार्थी नेते *जगदीश पंचबुधे* यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे* यांच्या नेतृत्वात आज दि.02-09-2020 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ.सुभाष चौधरी* यांचा घेराव करण्यात आला व विद्यार्थ्यांच्या विषयावर चर्चा करून निवेदन देण्यात आले ज्यात प्रामुख्याने आता चालू असलेल्या महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशाच्या 30 टक्के जागा वाढीबाबद कुलगुरू यांना संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली की आता देशात कोरोना महामारीचे संकट चालूच आहे त्यातल्यात्यात महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे पण अशे अनेक विद्यार्थी आहे जे रोज महाविद्यालयात प्रवेश मिळविण्या करिता जातात पण महाविद्यालय त्यांना आमच्या कडे जागा नाही अशे सांगतात या महामारीच्या काळात सुद्धा विद्यार्थी प्रवेशा साठी वन वन भटकत आहे पण महाविद्यालयात त्यांना प्रवेश मिळत नाही आणि यावर्षी 12 वि चा निकाल सुद्धा चांगल्या प्रकारे लागलेला आहे पण आता प्रथम वर्ष B.Sc, B.Com, B.BA, B.C.C.A, B.C.A प्रथम वर्षात प्रवेश देण्यात विद्यापीठ असमर्थ ठरलेला आहे.
दरवर्षी हा विद्यार्थ्यांचा प्रथम वर्षाचा प्रवेशाचा मोठा चिंतणाचा विषय होत असून सुद्धा विद्यापीठ दरवर्षी कोणत्याही प्रकारचा नियोजन करीत नसून विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांना हा डोकेदुखी तसेच मानसिक व आर्थिक त्रासदायक विषय झालेला आहे आणि आतातर ही कोरोना महामारी चालू आहे पण विद्यापीठ व महाविद्यालय दोघे ही विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा करत नाही आहे व विध्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचण निर्माण होत आहे.
विद्यापीठ प्रशासनाच्या आदेशानुसार सर्व महाविद्यालयानी गुणवंत यादी नुसार सदर शाखेत विध्यार्थ्यांना प्रवेश दिलेत. पण सर्व महाविद्यालयात 100 ते 75 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात आले आहे, व प्रवेश प्रक्रिया बंद चे फलक लावले आहेत, आता विद्यार्थी संभ्रमात सापडला आहे. तेव्हा आता बाकीचे विद्यार्थ्यांनी जायचे कुठे..? 35 टक्के ते 74 टक्के गुण घेऊन पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना समोरचे शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का..? की त्यांनी इयत्ता 12 वी पास करून खूप मोठी घोड चूक केली का..? या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही कुणाची..? अशे प्रशन राहुल कामळे यांनी कुलगुरू यांना केले त्यावर कुलगुरू डॉ.चौधरी यांनी निवेदनात केलेली मागणी त्वरित मंजूर करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की लवकरात लवकर सर्व महाविद्यालयात 30 टक्के प्रवेश वाढून देण्यात यावा जेणेकरून कुठल्याही विध्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही व सर्व विद्यार्थ्यांना आपले पुढील शिक्षण घेता येईल त्यावर संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की जर एक आठवळ्यात सर्व महाविद्यालयात प्रवेश 30 टक्के वाढीचे पत्र पोहचून प्रवेश देणे सुरू झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस विद्यापीठ परिसरात आंदोलन करेल व याची सर्व जबाबदारी ही विद्यापीठ प्रशासनाची राहील
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी पदवीधर संघ नागपूर जिल्हाध्यक्ष *गौतम वैद्य,* नागपूर शहर अध्यक्ष *विक्रांत मेश्राम,* रा.वि.काँ नागपूर जिल्हा सरचिटणीस *दर्शन बोढारे,* रा.वि.काँ नागपूर शहर उपाध्यक्ष *राहुल वाघमारे, मनीषा शाहू,* उत्तर नागपूर उपाध्यक्ष *निखिल चाफेकर,* *सुत्तम डोंगरे, पंकज राऊत, शुभम शहारे, आयुष चौहान, प्रीतम घ्यार, नुपूर काकडे, विश्वजित मोटघरे, गांधी भाऊ, अभय भिवंगळे, मंगेश दाणी, निशांत घोडे, सारंग गुप्ता, जय गाला, दिपक मरस्कोल्हे, राजू भुईकर, रोहित पिल्लेवान, पलाश धाबेकर, अश्विन डफ, मयुर झाडे, अभिजित सोनटक्के, अनिकेत दाबले, राहुल कोथळे, किरण रंदई, अमोल यंगलवार,जय पटेल, राहुल किन्हेकर, शुभम गजबिये, शाहनवाज खान, दिव्या जनबंधु, लंकुश लांबट, नीरज पाटील,* इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.