Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर ०२, २०२०

58 जणांनी केला दारुमुक्त होण्याचा निर्धार

सोमलपुर, हिंदेवाडा, चंदनवेली येथे शिबिरांचे आयोजन



गडचिरोली, 2 : मुक्तिपथ अभियानाद्वारे आयोजित तीन शिबिराच्या माध्यमातून 59 जणांनी उपचार घेऊन व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. धानोरा तालुक्यातील सोमलपुर, भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा, एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे एक दिवशीय व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. धानोरा तालुक्यातील सोमलपुर येथे आयोजित व्यसन उपचार शिबिराचा एकूण 19 व्यसनी रुग्णांनी लाभ घेतला. अरुण भोसले यांनी दारूचे व्यसन कसे दूर करावे, दारूचे दुष्परिणाम आदी संदर्भात रुग्णांचे समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन संयोजक छत्रपती घवघवे, तालुका प्रेरक भाष्कर कड्यामी यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्रामसभा अध्यक्ष मेहरसिंग गावडे, शांताराम पोटावी, क्रिष्णा पोटावी व गाव संघटनेने सहकार्य केले. भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा येथे गावसंघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. एकूण 20 रुग्णांनी शिबिराला भेट देऊन दारू सोडण्याचा संकल्प केला. संयोजक पुजा येलूरवार, समुपदेशक साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी पंस सभापती गोईताई कोडापे, मल्लरपोडूरच्या सरपंचा अरूनाताई वेलादी, सुधाकर तिम्मा, अशोक कुमरे, चंदू वेलादी, बाजीराव वेलादी यांनी उपस्थित राहून शिबिराला सहकार्य केले. शिबिराचे नियोजन तालुका उपसंघटक चिन्नू महाका, प्रेरक आबिद शेख यांनी केले. एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली येथे व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला एकूण 20 रुग्णांनी भेट दिली. 19 रुग्णावर उपचार करण्यात आला. दरम्यान मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांना मार्गदर्शन करीत व्यसनमुक्त राहण्याचे आवाहन केले. साईनाथ मोहूर्ले यांनी रुग्णांना समुपदेशन केले. शिबिराचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार, तालुका प्रेरक अतुल मट्टामी यांनी केले. यावेळी राकेश धवळे, पोलीस पाटील सदाशिव कुळहेटी, आशा वर्कर माधूरी लटारे, मुख्याध्यापक तलांडे, गाव संघटन सदस्य उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.