Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट ३१, २०२०

गायरण जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; उपसरपंचाच्या अडचणीत वाढ

राजुरा तहसीलदार यांचे उपसरपंच सर्वानंद वाघमारे यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश

गायरण जागेवर अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार




वाघमारे यांच्या अडचणीत वाढ
राजुरा/ प्रतिनिधी
बामनवाडा ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा शिवाजी हायस्कूल राजुरा येथील कर्मचारी सर्वानंद वाघमारे यांनी शासनाच्या सर्वे. नं.१७३ आराजी ०.५५ हे. आर. गायरण जमिनीवर बेकायदेशीर उद्यान केले आहे. ते एका नामांकित शिक्षण संस्थेचे कर्मचारी असून ते शासनाचा पगार घेतात.

बामनवाडा येथील बेकायदेशीर असलेल्या उद्यानाच्या नावावर अनेक निधी आणून तो निधी खर्ची केले असल्याची माहिती पुढे आली आहे. शासनाची परवानगी नसताना निधी मंजूर झाला कसा असा प्रश्न यावेळी निर्माण होत आहे. या जमिनीवर आदिवासींची पिढ्यानपिढ्या वाहिती असताना वाघमारे यांनी त्यांना वाहिती करू दिली नाही व तारेचा कुंपण करून घेतला. जमीन गेल्याने मुर्ती या गावी जावून शेती करीत आहो अशी आप बिती बामनवाडा येथील आदिवासी विठू कोडापे यांनी कथन केली.

सदर उद्यान बेकायदेशीर असल्याने या प्रकरणाची दखल राजुरा तहसीलदार यांनी घेतली असून उपसरपंच वाघमारे यांना अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिल्याची माहिती पुढे आली आहे.

शासनाची कुठलीही परवानगी नसताना वाघमारे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांचे कडून ग्रीन/ओपन जिम चे लाखोंचे साहित्य मिळविले. त्या उद्यानात साहित्य मिळाले कसे? असा सवाल यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे यांनी उपस्थित केला आहे.

सदर उद्यान बेकायदेशीर असल्याने दिनांक २१/८/२०२० ला तहसीलदार राजुरा यांचे कडून अतिक्रमण काढण्याचे आदेश उपसरपंच वाघमारे यांना आले आहे. सदर जमिनीवर अतिक्रण करणे, शासनाच्या निधीचा अपव्यय करणे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उपसरपंच वाघमारे अतिक्रमण काढणार काय? तहसीलदार राजुरा यांच्या आदेशाचे पालन उपसरपंच वाघमारे करणार काय? अतिक्रमण न काढल्यास तहसीलदार उपसरपंच वाघमारे यांचेवर कायदेशीर गुन्हा दाखल करणार काय? असे प्रश्न बामनवाडा येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. ८ दिवस लोटूनही अजूनही वाघमारे यांनी अतिक्रमण हटविले नाही. हे विशेष

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.