Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १९, २०२०

शहरात 177 वा जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा

पावर सिटी फोटोग्राफर्स क्लब व छायाचित्रकार 
बहुउद्देशीय संस्था चंद्रपुर यांचेमार्फत आयोजन
चंद्रपूर(खबरबात):
जागतिक स्तरावर 19 ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन साजरा करण्यात येत असतो. जिल्ह्यात पावर सिटी फोटोग्राफर क्लब व छायाचित्रकार बहुद्देशीय संस्था चंदेरपूरतर्फे 177 वा जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
दिनांक 19 ऑगस्ट रोजी सकाळी 6:30 वाजता छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शहरातील जटपुरा गेट ते पठाणपुरा गेट पावर सिटी फोटोग्राफर क्लब चंद्रपुर तसेच छायाचित्रकार बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सोशल डिस्टंसिंग ठेवत फोटो वॉकचे आयोजन करण्यात आले.यावेळी शहरातील छायाचित्रकार सहभागी झाले होते.
पठाणपुरा गेट येथे सर्व छायाचित्रकारांनी जागतिक छायाचित्र दिनाच्या शुभेच्छा देत केक कापून आनंद साजरा करण्यात आला.
जीवनातील अनमोल आठवणी कायम स्मरणात ठेवण्याचे काम आपल्याजवळील छायाचित्र करीत असते. ज्या गोष्टी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही त्या गोष्टी एका छायाचित्राच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकतात. अशा छायाचित्राच्या माध्यमातून जीवनातील आठवणी कायम स्मरणात रहाव्यात यासाठी आजचा दिवस छायाचित्रकारांना आनंदाचा असतो.
शहरात पावर सिटी फोटोग्राफर क्लबच्यावतीने कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पीसीपीसी चे संयोजक देवानंद साखरकर, गोलू बाराहाते, ग्रुप मेंबर विशाल वाटेकर ,अमोल मेश्राम ,रोहित बेलसरे ,राहुल चिलगीलवार , करण तोकट्टीवार, टिंकू खाडे, नंदू लभाने तसेच छायाचित्रकार संस्थेचे फुलचंद मेश्राम, रवि भगत, योगेश मांदाडे, साजन रायपूरे, दिपक शर्मा , विवेक मांडवकर, योगेश धकाते, जितू क्षीरसागर , सत्यम, रवि पाटणकर, योगेश हूळ नितीन टहलीयानी तसेच शहरातील .बहुतांश छायाचित्रकार उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.