Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट १९, २०२०

तीन पिढयापासुन लोक म्हणातयतं! कोयना धरण फुटणार म्हणुन

⭕ तीन पिढयापासुन लोक म्हणातयतं!  कोयना धरण फुटणार म्हणुन ⭕
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
________________________

दि. १९ आॅगष्ट २०२० 
कोयना बहुउद्देशीय प्रकल्प कोयना  नदीवर १९५६ मध्ये हे धरण बांधण्यास सुरुवात झाली आणि १९६४ मध्ये हे सुसज्ज धरण राष्ट्राला समर्पित करण्यात आले. 

https://bit.ly/2YgwFX3
११ फेब्रुवारी १९४७ साली  कोयना क्षेत्रात ५.४  रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला. याला  ५० वर्षे  झाली आहेत.कोयना धरण फुटणार ? ही  महाराष्ट्रात अफवा  वेगाने पसरली की कराड सांगली, कोल्हापूर, बेळगाव  वाहून जाणार.या अफवेने महाराष्ट्रात भितीचे वातावरण तयार झाले. पण सुदैवाने भूकंपामुळे  धरणाला काहीही झाले नव्हते. हेच निमित्त होते. कोयना धरण फुटीच्या चर्चेचे.त्यातच १२ जुलै, १९६१ रोजी महाराष्ट्रातील  पुणे जिल्ह्यातील पानशेत धरण  फुटून संपूर्ण पुणे वाहून गेले होते. यामुळे चर्चैला जास्तच जोर चढला होता. गेल्या तीन पिढया या चर्चा चालु आहेत. कृष्णेच्या पट्ट्यात नदीकाठी येणाऱ्या  प्रत्येक गावात शासनाने नंबरी दगड आणून लावलेत. कारण काय तर कोयना धरण फुटलं तर कुठंपर्यन्त पाणी येईल,  याचा सर्वे शासनाने केला आहे. ही  सांगणारी दिशा म्हणजे हे दगड आहेत. कराडच्या टॉवरवर बसुन कावळा पाणी पिणारं इतकं पाणी कोयना फुटल्यावर येणारं हि जुन्या  जाणत्या लोकांची चर्चा आजही होत असते.



प्रशासनाने वेळोवेळी कोयना धरणाला काहीही होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना धरण फुटल्यावर पाणी कुठंपर्यन्त येणार हाच अंदाज बांधण्यात लोकाना इंटरेस्ट होता.
कोयना  धरण फुटले तर  येणाऱ्या आपत्तीचा आपण फक्त अंदाजच लाऊ शकतो ?
आता आपण फक्त अंदाज लाऊया की कोयना धरण फुटले तर त्याचा जल प्रकोप  कीती भयानक असेल ते हि येणारी आपत्ती फक्त एका जिल्ह्यापुरती किंव्हा एका राज्यापुरती मर्यादित राहणार नाही तर ही आपत्ती तीन ते चार राज्यात विनाश करेल. कारण कृष्णेच्या  पट्टयात कर्नाटकातील मोठे आलमट्टी कोयना धरण हि येते.ते सुद्धा सुरक्षित राहणार नाही. आणि कर्नाटका नंतर तामिळनाडूला पण याचा सामना करावा लागेल. हा जलतांडव जिवित व वित्तहानी इतकी प्रचंड करेल की  होणाऱ्या नुकसानीची भरपाई करताना आपली एक पिढी म्हातारी होईल.हा फक्त अंदाज आहे.
कोयनाच नाही तर देशातील सर्वच धरणांवर केंद्र व राज्य शासनाचे बारकाईने लक्ष असते. धरणावर राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावरील वेज्ञानिकांच्या समित्या निरीक्षण करत असतात . रात्र-दिवस प्रशासकीय व  कर्मचारी वर्ग धरणाची देखभाल दुरुस्ती करत असतात.मग तो कितीही मोठा भूकंप येऊ दे धरण सुरक्षितच राहणार आहे.
कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे. वीजनिर्मिती व सिंचन अशा दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा यशस्वीपणे भागवून राज्याला स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प म्हणून कोयना प्रकल्पाकडे पाहिले जाते. या धरणात 98.78 अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची साठवण होऊ शकते.
काही वर्षांपूर्वी धरणाच्या दाराची उंची वाढवून मजबुतीकरणानंतर या पाणीसाठ्याची क्षमता 105.25 अब्ज घनफूट करण्यात आली आहे. रबल काँक्रीट या प्रकारात बांधण्यात आलेल्या या धरणाची उंची 103.02 मी असून लांबी 807.72 मी आहे. तसंच पाणीसाठ्याची क्षमता 2797.4 दशलक्ष घनमीटर असून वापरण्यायोग्य क्षमता 2677.6 दशलक्ष घनमीटर आहे. कोयना हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धरण आहे.
कोयना परिसरात झालेल्या या भूकंपानंतर अनेक लहानमोठ्ठे धक्के परिसरात जाणवले. पण कोयनेच्या भिंतींना साधी एक चीर पडली नाही.इतके भक्कम धरण आहे.
शेवटी लोकाना काय फक्त चर्चा हव्या असतात. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.