नागपूर/अरूण कराळे(खबरबात):
मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान राजगृहावर मंगळवार ७ जूलै रोजी काही समाजकंटक अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला.या हल्यामुळे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण भारत भर या घटनेमुळे निषेध व्यक्त व्यक्त केला जात आहे.
परत अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डॉ.बाबासाहेबांच्या वास्तुला संरक्षण देण्यात येऊन या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून त्वरित अटक करण्यात यावी याकरिता वाडी-दवलामेटी परिसरातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नागपूर तालुका ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी व तहसीलदार मोहन टिकले यांचे मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देऊन भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध केला.
यावेळी शिक्षण सभापती भारती पाटील,नागपूर पंचायत समिती सभापती रेखा वरठी,जिल्हा परिषद सदस्या ममता धोपटे,ग्रामीण काँग्रेस कमिटी महासचिव दुर्योधन ढोणे,माजी नगरसेवक राजेश जैस्वाल,रॉकाचे सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रकाश कोकाटे,राष्ट्रवादी वाडी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर,हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस,वाडी शहर काँग्रेस अध्यक्ष शैलेश थोराने,अनिल पाटील,रॉबिन शेलारे,उपसरपंच महेश चोखांद्रे ,भीमराव लोखंडे,प्रा. सुरेंद्र मोरे,भीमराव कांबळे,राजेश थोराने,पियुष बांते,अशोक गडलिंगे,नरेंद्र वरठी,योगेश कुमकुमवार प्रामुख्याने उपस्थित होते.