Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै १३, २०२०

चंद्रपूरचा आकडा वाढतोय:आज पुन्हा 11 कोरोना बाधित



आतापर्यंतची बाधित संख्या 198
98 बाधितांवर उपचार सुरू

संस्थात्मक अलगीकरणात एक हजारावर नागरिक
87 हजारावर नागरिक जिल्ह्यात दाखल
84 हजारावर नागरीकांचे गृह अलगीकरण पूर्ण


चंद्रपूर(खबरबात):
 जिल्ह्यामध्ये सोमवारी 11 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कालपर्यंत 187 असणारी बाधितांची संख्या वाढून आता 198 झाली. उपचार घेत असलेल्या 98 बाधितांपैकी 15 जण हे जिल्ह्याबाहेरील बाधित असून राज्य राखीव पोलीस दलाचे 10 जवान व 5 जण अन्य राज्याचे रहिवाशी आहेत. जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत एकही बाधितांचा मृत्यू झालेला नाही.

आज पुढे आलेल्या बाधितामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 10 बाधितांचा समावेश आहे. यामध्ये बापट नगर, वडगाव पोलीस चौकी जवळील खासगी रुग्णालयात कार्यरत 32 वर्षीय महिला, उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलच्या कामावर असलेल्या तिघांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहे. सध्या पागल बाबा नगर परिसरात कार्यरत असणाऱ्या 28 ,32 व 23 वर्षाच्या अनुक्रमे तीन पुरुषाचा बाधितात समावेश आहे.

राज्य राखीव दलाच्या आणखी दोन 25 व 29 वर्षाच्या जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत राज्य राखीव दलाचे या दोनसह एकूण 10 जवान चंद्रपूरमध्ये आल्यानंतर तपासणीमध्ये पॉझिटिव्ह ठरले आहे.

चंद्रपूर शहरातीलच घुटकाळा तलाव परिसरातील यवतमाळ येथून परतलेले 62 वर्षीय पुरुष, एका खासगी रुग्णालयात आता पर्यत वैद्यकीय उपचार घेत असलेले साईबाबा मंदिराच्या मागील 88 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, पुणे येथून प्रवासाचा संदर्भ असणाऱ्या 58 वर्षीय आझाद हिंद चौक येथील गृह अलगीकरणातील महिला तसेच राजस्थान येथील रहिवाशी असणाऱ्या म्हाडा कॉलनीतील संस्थात्मक अलगीकरणात असणारा 26 वर्षीय पुरुष व ताडाळी जवळील ऊर्जाग्राम येथील संपर्कातील 50 वर्षीय नागरिकाचा आजच्या 11 पॉझिटिव्ह मध्ये सहभाग आहे.

आजच्या 11 बाधितांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याबाहेरील बाधिताची संख्या सहा आहे. यापूर्वी 9 जण बाहेरचे होते. त्यामुळे 198 पैकी 15 बाधित अन्य जिल्हयाचे व राज्याचे आहेत .

जिल्ह्यात एकूण संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 99 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 222 नागरिक,तालुकास्तरावर 464 नागरिक तर, जिल्हास्तरावर 413 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 87 हजार 63 नागरिक दाखल झाले आहेत. 84 हजार 789 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. 2 हजार 274 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.

राजुरा येथील कोविड केअर सेंटरला तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी पाहणी केली. तसेच गडचांदूर नगरपालिका परिसरातील केंद्राची मुख्याधिकारी डॉ.विशाखा शेळके यांनी पाहणी केली. पाहणी करताना कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्यविषयक सुविधांविषयीचा आढावा घेतला. बाधितांची कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना तहसीलदार यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्यात.

आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण 
चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित )व 13जुलै ( एकूण 11 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 198 झाले आहेत. आतापर्यत 100 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 198 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 98 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.