Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै ०३, २०२०

चंद्रपूर जिल्हयातील आतापर्यंतची बाधित संख्या १०२




  • उपचार घेणारे कोरोना बाधित ४६
  • आतापर्यत ५६ कोरोनातून बरे

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन जुलै रोजी रात्री उशिरा १०२ वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.
चार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील ३४ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला ३३ वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या २१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा २४ वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर अवालपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. काल १ जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) आणि २ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १०२ झाले आहेत. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १०२ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४६ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.