वाडी शहरातील दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या पाहता अंतर्गत समस्यातही तेवढ्याच प्रमाणात भर पडत आहे.वाढत्या समस्या लक्षात घेता यापेक्षा ग्राम पंचायत प्रशासन बरे होते असे म्हणायची वेळ स्थानिक नागरिकांवर आलेली आहे.नगर परिषद वाडीचा पाच वर्षांचा कालखंड संपल्यामुळे नगरसेवक बरखास्त होऊन प्रशासक शहराचा कारभार पाहत आहे.संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वचप न राहल्याने समस्यांचा शहरात डोंगर उभा राहीला आहे.
शहरात असलेल्या मुख्य नाल्याची साफ-सफाई,अंतर्गत रस्त्यात पडलेले खड्डे मुरूम डस्ट टाकून बुजविणे,डम्पिंग यार्ड मधील कचऱ्याची विल्लेवाट लावणे,जन्म-मृत्यू,रहिवासी व अत्यावश्यक प्रमाणपत्र त्वरित फी आकारणी करून देण्यात यावे,कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना करावी,सध्या शहरात डासांचे प्रमाण वाढत असल्याने सर्वत्र फॉगिंग मशीन ने फवारणी करावी,लोकसेवा हमी कायद्या अंतर्गत नागरिकांना सेवा उपलब्ध करावी,लिंक न झालेल्या राशन कार्ड धारकांना राशन देण्यात यावे,मोकाट जनावरे व लावारीस कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,रस्ते सिमेंटकरण करावे,शहरातील बंद असलेले पथदिवे सुरू करण्यात यावे.
उपरोक्त समस्या तातडीने सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकारी,नगर परिषद प्रशासक इंदिरा चौधरी यांना राष्ट्रवादीचे जेष्ठ कार्यकर्ते राजेश जयस्वाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे, वाडी शहर अध्यक्ष वसंतराव इखनकर,अशोक माने,योगेश चरडे, दिनेश उईके,कृष्णा चरडे,नरेंद्र राऊत,दत्ता वानखेडे,दिलीप दोरखंडे,राजू खोब्रागडे आदी शिष्टमंडळाने निवेदन दिले.