Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २०, २०२०

चंद्रपूर३०० पार:एकाच दिवशी सापडले २९ कोरोना बाधित;चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३०५

Corona Virus in Chandrapur; संशयित कोरोना ...
 मूल येथील राईस मीलमधील आतापर्यत २४ कामगार पॉझिटीव्ह
चंद्रपूरमध्ये एकाच दिवशी २९ बाधित पुढे आले
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या १४२
१६३ बाधित कोरोनातून बरे 
चंद्रपूर(खबरबात): 
 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये सोमवारी सायंकाळी आणखी ११ बाधिताची भर पडली आहे. त्यामुळे सकाळी १८ अधिक सायंकाळी ११ असे एकूण २९ बाधित एकाच दिवशी पुढे आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ३०५ बाधितांपैकी  १६३ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर १४२ जणांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितामध्ये ४ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत.
      आज सायंकाळी पुढे आलेल्या ११ बाधितांमध्ये राज्य राखीव पोलीस दलातील भद्रावती जैन मंदीर येथे ठेवण्यात आलेल्या तुकडीतील चार जवानांचा समावेश आहे. यापूर्वी १९ जवान चंद्रपूर मध्ये करण्यात आलेल्या चाचणी दरम्यान पॉझिटिव्ह ठरले आहेत. आज चार जवान आणखी चाचणीत पॉझिटिव्ह ठरले असून आत्तापर्यंत एकूण २३ जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत.
     तर नवीन वस्ती दाताळा येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्य पॉझिटिव्ह ठरले आहे. या कुटुंबातील महिला पॉझिटिव्ह ठरली होती. याच कुटुंबातील संस्थात्मक अलगीकरणात असणारे ५७, ३२ व ३३ वर्षीय निकटच्या संपर्कातील तिघेही पॉझिटिव्ह ठरले आहेत.
    चंद्रपूर येथील साई नगर परिसरातील स्नेह साई पॉलीटेक्निक जवळ राहणाऱ्या ४६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातून त्यांना हा संसर्ग झाला आहे.
    मुंबईवरून रेड झोनमधून परत आलेली क्रीस्टल प्लॉझा नजीकच्या रहिवाशी असणाऱ्या 45 वर्षीय महिला आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होत्या. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
    चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड परिसरात राहणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून परत आलेल्या २४ वर्षीय व्यक्तीची अॅन्टीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
    तत्पूर्वी दुपारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या १२ कामगारांचा समावेश आहे . १२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती. यापूर्वी १२ कामगार  पॉझिटीव्ह ठरले होते. आजच्या १२ कामगारांमुळे  एकूण २४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत.
       चंद्रपूर महानगरातील यापूर्वी पॉझिटिव आलेल्या जैन मंदिर तुकुम परिसरातील एका बाधितांचे दहा व पंधरा वर्षीय मुले चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. मुल येथील रहिवासी असणाऱ्या 30 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुसावळ येथून प्रवासाची त्यांची नोंद आहे.
    कोरपना तालुक्यातील उपरवाही या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील गावातील ताप सदृश्य आजाराने ग्रस्त असणारा 36 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे.
     सोबतच ब्रह्मपुरी तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये हैदराबाद येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील किनी येथील 29 वर्षीय युवकाचा समावेश आहे. कुर्झा येथे संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या या युवकाचा काल स्वॅब घेण्यात आला होता.
.      अमरावती येथून ब्रह्मपुरी पटेल नगर येथे परतलेल्या 29 वर्षीय महिलेचा २ स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. 15 जुलैला अमरावती येथून परतल्यानंतर ही महिला संस्थात्मक अलगीकरणात होती. 18 जुलैला स्वॅब घेण्यात आला. महिला आता पॉझिटिव्ह ठरली आहे.

      जिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै (( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित )  १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) १९ जुलै ( एकूण बाधित १६ ) व २० जुलै ( एकूण बाधित १८ )अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित ३०५ झाले आहेत. आतापर्यत १६३ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३०५पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता १४२ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.