स्थानीक नागरीकांचे आरोग्य धोक्यात
अश्विन बैस यांचा आंदोलन करण्याचा इशारा
नागपूर / अरूण कराळे (खबरबात):
येथील वॉर्ड क्रमांक ५ मधील आदर्श नगर ते गौतम नगर पर्यंतची सेफ्टी टँक , गडर व सांडपाणी वाहून नेणारी पाईप लाईन बुजल्यामुळे परिसरात आठ दिवसापासुन घाण पाणी रस्त्यावर वाहत होते आता तर गडरचे पाणी घरात घुसले आहे . जागोजागी पाण्याचे डबके साचून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे .अदृश्य स्वरूपातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असुन इतर विविध आजाराने थैमान घातले आहे .
परिसरात डेंग्यू आजार फोफाविण्याची भीती नागरिकांमध्ये असतांना प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याची स्थानिकांची ओरड आहे.स्वच्छ वाडी सुंदर वाडीचा नारा देणारी नगर परिषद आदर्शनगर येथील घरात जाणाऱ्या व रस्त्यावर वाहणाऱ्या घाण पाण्याकडे दुर्लक्ष करीत आहे .
दोन दिवसाच्या आत गडरलाईनची दुरुस्ती केली नाही तर आदर्शनगर मधील सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगर परिषदला घेराव घालण्याचा इशारा हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अश्वीन बैस, भाजपाचे मनोज रागीट, स्थानीक नागरीक गणेश बावणे,सागर कारेमोरे शिवदास सुथार, संदीप साठवने, गणेश खंडारे, रमेश चौधरी, चंदन सुथार, प्रविण अन्नपूर्णे ,खुशाल सांभारे, लक्ष्मण चौधरी यांनी दिला आहे.