संपूर्ण देशात लॉकडाऊनचे वातावरण असतांना लग्न मात्र करतांना अडचणी वाढत आहे. त्या अडचणी दूर करीत लग्नसोहळे मात्र दोन्हीकडील २० वऱ्हाडी च्या उपस्थितीत पार पडत आहे.
नागपूर तालुक्यातील लाव्हा ग्रामपंचायत मध्ये सोमवार २५ मे रोजी कुठलाही वाजागाजा न करता कमीतकमी खर्चात आदर्श विवाह सोहळा पार पडला. या लग्नात तालुक्यातील अधिकारी वऱ्हाडी म्हणून आले. आणि नवरदेव नवरीला भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या .वर योगेश महादेव देशमुख यांचे लग्न वधू माधूरी देवघर बोडके यांचेशी नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले व गटविकास अधिकारी किरण कोवे, सरपंच ज्योत्सना नितनवरे यांच्या उपस्थित पार पडले. याप्रसंगी जि.प सदस्य ममता धोपटे, पं.स. सदस्य प्रीती अखंड ,पं. स. माजी उपसभापती सुजित नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे, ग्रामविकास अधिकारी विकास लाडे, ग्रा. पं. सदस्य पांडुरंग बोरकर, पुरुषोत्तम गोरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.