चंद्रपूर(खबरबात):
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नान्होरी जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वांरंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि २५ मे रोजी दाखल केली आहे त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
१५ एप्रिलला पुणे येथून आली असल्याने गावातील शाळेत कारंटाईन केले सदर युवती दि २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता शाळेतील नळावर हात-पाय धूत असताना आरोपी काकाजी प्रधान शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आणि डात पकडून अश्लील चाळे व शिविगाळ केली.
यावेळी सदर युवतीच्या ओरडण्यामूळे विलगीकरणात असलेल्या बहिणीने व ईतर लोकांनी युवतीच्या दिशेने धाव घेऊन आरोपीला डटकले व ग्रामपंचायत चपराशी याने आरोपीला शाळेच्या बाडेर काढले त्यांनतर आरोपीने पळ काढला काही वेळाने सदर घटनेची घेऊन माहिती चुलत भावाला व सरपंच यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ शाळेकडे धाव घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करून आरोपीच्या घराकडे गेले असता आरोपी काकाजी प्रधान याने चुलत भावाला स्लासने मारहाण केली त्यामुळे चुलत भाऊ जखमी झाला.
असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम ९४,३२३,३५४,५०६ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत