🔸 चार हजारावर नागरीकांचे संस्थात्मक अलगीकरण
🔸 56 हजारावर नागरिकांचे गृह अलगीकरण पुर्ण
चंद्रपूर : जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 संक्रमित रुग्णांची संख्या 22 असून 7 रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेले आहे. व 14 रुग्णांना कोविड केअर सेंटर,वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहे. तर, एक पॉझिटीव्ह 16 व 17 मे रोजी पुन्हा घेण्यात आलेल्या चाचणीनंतर रुग्ण निगेटिव्ह आल्यामुळे कोविड-19 संक्रमित आलेल्या रुग्णांमधून कमी करण्यात आला.आता पर्यंत जिल्ह्यात 22 रुग्ण होते. हा एक रूग्ण वगळता सध्या जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 21 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.