मोजक्या पाहुणेमंडळीत सामाजिक अंतर राखत तर्जुले व ढवळे परिवारांचा आदर्श विवाह
संजीव बडोले/नवेगावबांध.
दिनांक 25 मे 2020
नवेगावबांध:-येथील रहिवासी व चंद्रपूर जिल्ह्यातील उप्परवाही येथे बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत दुर्वेश त्रिलोकचंद तर्जुले यांचा विवाह कन्नमवार वार्ड नंबर 17 गडचिरोली येथील भिमरावजी ढवळे यांची मुलगी सोनिया हिच्याशी निश्चित झाले होते. 11एप्रिल ला विवाहाचा मुहूर्त देखील निघाला होता. दुर्वेश हा त्रिलोकचंद तर्जुले यांचा सर्वात धाकटा मुलगा. घरी शेवटचे लग्न सर्व सोयऱ्या धार्यांना मुलाच्या लग्नात आमंत्रित करून मुलाचा लग्न धुमधडाक्यात व्हावा अशी वडिलांचीइच्छा ,लग्नाच्या बार उडवण्याच्या आनंद लुटावा यासाठी नातेवाईक मंडळीही आसुसलेली होती. तसेच लग्न आयुष्यात एकदाच होते म्हणून थाटामाटात करावा. असे दुर्वेश लाही वाटत होते. परंतु 22 मार्चपासून covid-19 कोरोनाव्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी राज्यात लागू झाली. त्यामुळे 11 एप्रिल ला होणाऱ्या विवाहाचा बेत रद्द करावा लागला. घरची मंडळी व नातेवाईकही निराश झाले. तर्जुले कुटुंबीयांच्या आनंदावर विरजण पडले. आता करायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. यातून काही मार्ग काढला पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. मग वरपिता त्रिलोकचंद व त्यांचे व्याही भिमराव ढवळे यांनी प्रशासनाला लग्नाची परवानगी मागितली. त्यात प्रशासनाने तीन व्यक्तींना वरात नेण्यासाठी परवानगी दिली. वराकडचे 20 -20 पाहुणे उपस्थित राहतील अशी परवानगी प्रशासनाने दिली. दिनांक 24 मे रविवारला सकाळी 9.00 वाजता येथील प्रशिक बुद्धविहारात लग्नाचा खर्च तर वाचला, आता या उरलेल्या पैशाचं सामाजिक कार्यासाठी थोडे बहुत उपयोग करावा. या हेतूने वर दुर्वेश याने येथे दोनशे मास्क व सॅनिटायझरचे गावकऱ्यांना वाटप केले. भावी सहचारिणी च्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी वर दुर्वेश, त्याचे वडील त्रिलोकचंद व आई विमलबाईसह चार चाकी वाहनाचे सारथी स्वतः बनून विवाह समारंभासाठी कन्नमवारनगर गडचिरोली येथे हे रवाना झाले. गडचिरोली येथे कन्नमवार नगरातील वधूपिता भीमराव ढवळे यांचे राहते घरी थाटामाटाला, जेवणाच्या पंगतीला फाटा देत, हा आदर्श विवाह संपन्न झाला. वर-वधू कडील मोजक्या पाहुणेमंडळी व नातेवाईकांनी सामाजिक अंतर राखत, वर वधूंना आशीर्वाद दिला. तसेच भावी यशस्वी व मंगलमय जीवनाच्या शुभेच्छा दिल्यात. मंगल परिणयाच्या आधी गावकऱ्यांना वर दुर्वेश यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून ,आपले सामाजिक ऋण कृतीतून व्यक्त केले. या आदर्श विवाहाने आजच्या उच्चशिक्षित युवकांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
धाकट्या मुलाचा आमच्या घरचा शेवटचा लग्न. त्यामुळे सहाजिकच घरी व नातेवाईकात या लग्नाबाबत खूप उत्सुकता होती. परंतु अचानक कोरानामुळे थाटामाटात लग्न करण्याची इच्छा अपूर्ण राहिली. स्वयंपाकी, वाजंत्री, डेकोरेशनवाले यांना ॲडव्हान्स दिले होते. कोरोणामुळे आलेल्या गंभीर परिस्थितीचे भान ठेवून, लग्न साध्या पद्धतीने उरकण्यात आले. मुलाचे लग्न झाले, सून घरी आली, याचा आपल्याला आनंद आहे.
- वरपिता त्रिलोकचंद तर्जुले, नवेगाव बांध.