प्रशासन लागले कामाला
संजीव बडोले/नवेगावबांध
दिनांक 26 मे 2020.
नवेगावबांध दिं.25.
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथे बरडटोली परिसरात कोरोना बाधित एक व्यक्ती आढळल्याने अर्जुनी मोरगाव येथे एकच खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती मुंबई वरून काही दिवसांपूर्वी आलेला आहे. असे समजते. त्याचा तो कोरोना बाधीत असल्याचा रिपोर्ट काल दिं.25 मे ला आला. त्याला अर्जुनीमोर येथील कोविड केअर सेंटर मध्ये एसएसजे महाविद्यालयात ठेवले आहे.आता तालुक्यातील एकूण बाधितांचे संख्या 27 इतकी झाली आहे. तर गोंदिया जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 48 एवढी झाली आहे.तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 47 झाली आहे. सध्या अर्जुनी मोरगाव तालुका हा जिल्ह्यातील कोरोनाचा हाटस्पॉट ठरला आहे.
अर्जुनी मोरगाव बरडटोली भागात एक कोरोना पझिटिव्ह व्यक्ति आढळून आल्यामुळे.या परिसराची अधिकाऱ्यांकरवी निरीक्षण करण्यात आले. अर्जुनी मोरच्या उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शिल्पा सोनाले यांनी, विनोद मेश्राम तहसीलदार अर्जुनी मोरगाव,शिल्पा राणी जाधव मुख्याधिकारी नगर पंचायत, पोलिस निरीक्षक महादेव तोंडले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय राऊत, मंडळ अधिकारी पवार, तलाठी कापगते यांच्यासह कन्टोन्मेंट झोन तयार करण्या करीता बरडटोली परिसराची पाहणी केली. आतापर्यंत सुरक्षित असलेल्या अर्जुनी मोरगावात बरडटोली परिसरात एक व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. अर्जुनी मोरगाव कन्टोनमेंट झोन जाहीर करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.