चंद्रपूर/ प्रतिनिधी
एकीकडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी हैराण असताना चंद्रपूर शहरातील मुख्य बाजारात दुकान असलेले एक व्यापारी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. नितीन गनशेट्टीवार (वय 43) असे या व्यापा-याचे नाव असून, पोलिस तपास करीत आहेत.
गणपती मंदीर जवळ, बालाजी वार्ङ चंद्रपूर येथे राहणारे नितीन गनशेट्टीवार हे सोमवारी घराबाहेर गेले. मात्र, ते घरी परत आले नाहीत. सोमवारपासून बेपत्ता असून, त्यांची दुचाकी चौकात बेवारस सापङली. ते व्यापारी असून, त्यांचे मार्केटमध्ये दुकान आहे. माहिती मिळाल्यास कृपया संपर्क साधावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.