बुधवारी सांभाळणार कार्यभार
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
तालुक्यातील वाडी नगरपरिषदची मुदत मंगळवार १९ मे २०२० रोजी संपल्यामुळे नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांची वाडी नगरपरिषदच्या प्रशासक पदी नियुक्ती करण्यात आली. त्या बुधवार २० मे रोजी पासून प्रशासकपदाचा कार्यभार सांभाळणार आहे .
राज्य निवडणूक आयोग व भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३ यू तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४०,४१ मधील तरतुदींचे अनुषंगाने महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबईचे प्रधान सचिव यांचे आदेश अनन्व्ये दिशा निदेशानुसार जिल्हाधिकारी नागपूर यांनी वाडी नगर परिषदेची मुदत १९ मे २०२० रोजी संपत असलेल्या समाप्ती लगतच्या दिवसापासून नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांची प्रशासक पदावर नियुक्ती केली आहे.
वाडी नगर परिषदेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यात होणार होती .परंतु राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सदर निवडणूक रद्द करण्यात आली होती.एसडीओ इंदिरा चौधरी बुधवार २० मे रोजी वाडी नगर परिषदेचा प्रशासक पदाचा कार्यभार घेत असून सध्या स्थितीत त्या नागपूर ग्रामीण तालूका व हिंगणा तालुक्याचा उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यभार पाहत असून एक कर्तव्यदक्ष,तत्पर,प्रामाणिक व मोठा प्रशासकीय अनुभव असलेल्या अधिकारी म्हणून त्यांची दोन्ही तालुक्यात ओळख आहे.त्यांच्याकडे अतिरिक्त आलेला कार्यभार त्या चांगल्या पध्द्तीने सांभाळून नगर परिषद क्षेत्रात असलेल्या विविध समस्या सोडविण्यात त्या यशस्वी होतील.असे जाणकारांचे मत आहे.