अंजनवतीचा नवरदेव लॉक झाला
गव्हा फरकाडेच्या नवरीसोबत
नागपूर/अरुण कराळे(खबरबात):
सध्या शुभमंगल सावधानचा महीना असतांनाही चिननिर्मीत कोरोनामुळे मंगल कार्यालय सुनीसुनी पडली आहे. मात्र काही लोक संचारबंदीच्या काळातही ठरल्याप्रमाणे विवाह करत आहेत . त्यासाठी मग थाटमाट आणि गर्दीला फाटा देत लग्न उरकून घेत आहे .
हिंदू वैदिक संस्कृतीत सोळा संस्कारापैकी विवाह एक पवित्र संस्कार असून विवाह दोन आत्म्यांच्या मिलनासोबत दोन परिवाराला एकत्र आणणारा सोहळा आहे . त्यामुळे सहाजिकच विवाह सोहळा दोन्ही परिवाराकरिता आनंदोत्सव असल्यामुळे तो धुमधडाक्यात साजरा केला जातो . परंतु लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लग्न समारंभाचा काळही संपत येत आहे . तीन महीन्यापूर्वी साक्षगंध झालेले नवरदेव नवरी मात्र आता थांबण्याच्याही मनस्थितीत दिसत नाही त्यामुळे आता कसेही करुन लग्न उरकुन घ्या असा संदेश नवरदेव नवरीच्या आई वडीलाकडून होत आहे .त्यामुळे लॉकडाऊन मध्ये लग्नसमारंभ वाढत आहे .
मंगळवार १९ मे रोजी संचारबंदी नियमाचे तंतोतंत पालन करीत चि. सुरज सुभाष कराळे रा . अंजनवती ता. धामनगाव( रेल्वे) जि . अमरावती यांचा विवाह चि. सौ. का. रीना अनिल निस्ताने गव्हा (फरकाडे) ता . धामनगाव ( रेल्वे ) जि. अमरावती यांचा विवाह कराळे व निस्ताने कुटूंबातील फक्त १० लोकांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला .