Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे १३, २०२०

गळ्यास आवरलेल्या दोरामुळे जखमी असलेल्या बैलास इको-प्रो कडून रेस्क्यू व उपचार

 पशुवैदयिकीय अधिकारी कडून उपचार सुरु 
चंद्रपूर(खबरबात): शहरातील बाबटनगर परिसरामध्ये एका गोऱ्याच्या गळ्यात दोर घट्ट आवडल्यामुळे गंभीर जखमी असल्याची माहितीइको-प्रो ला मिळाली, माहिती मिळताच स्थानिक वृंदावन नगर राष्ट्रवादी नगर मधील इको-प्रो सदस्यांनी घटनास्थळ गाठून सदर गोराचे रेस्क्यू करून पशुवैद्यकिय दवाखान्यात नेण्यात आले.

शहरातील बापट नगर परिसरात गाईचा लहान बछड़ा-गोरा लहान असताना गळ्यात बांधलेला दोर सोडण्यात न आल्याने आणि गेली अनेक महीने मोकाट असल्याने याची वाढ जसजशी होत गेली तसतसे गळ्यातील दोरीचा फास आवळत गेला आणि या प्रमाणात आवरला गेला की त्याच्या मानेला गोल रिंगण होत संपूर्ण गळा सभोवतालचा मास कापला जाऊन गंभीर जखम झालेली होती. पूर्ण स्क्रीन चा भाग कापला गेला होता, अशी स्थिती पाहून तो मरेल कि काय असेल अशी शंका उपस्थित झाल्याने स्थानिक नागरिक आदित्य गिलबिले यानी इको-प्रो कड़े मदतीसाठी फोन केला. माहिती मिळतात वृंदावन नगर राष्ट्रवादी नगर मधील सागर कावळे, महेश होकर्णे, सुरज कावळे हे कार्यकर्ते घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने सदर बैल-गोऱ्याचे रेस्क्यू करून वाहनाने सदर गोऱ्यास नगीनाबाग येथील पशु वैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले.

या रुग्णालयातिल पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पी डी कडूकर यांनी त्याच्यावर उपचार करीत गळ्यासभोवताल घट्ट आवडलेला दोर कापून काढण्यात आला व त्याची जखम स्वच्छ करून पुढील उपचार करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी सुचवल्या प्रमाणे पुढील आठ-दहा दिवस त्याच्या औषधोपचार करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन शहरातील पशु-प्राण्यासाठी काम करणारी 'प्यार फाऊंडेशनचे' दाताळा येथील केंद्रामध्ये देण्यात आले आहे. दाताळा येथील केंद्रातील देवेंद्र रापेल्ली यांचेकडे सोपविन्यात आले आणि पुढील काळजी घेण्याकरिता आम्ही तयार असल्याचे सांगितले इको-प्रो तर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिक यांच्या जागरूकतेमुळे सदर बाब वेळीच लक्ष्यात आल्याने इको-प्रो सदस्य, पशुवैद्यकीय अधिकारी व प्यार फाउंडेशनच्या वतीने सदर गोरा वाचवणे सहज शक्य झाले.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.