Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे २१, २०२०

गोंदिया जिल्हयात कोरोनाचे तब्बल २६ नविन रुग्ण आढळले






संजीव बडोले/नवेगावबांध

दिनांक 21मे 2020
नवेगावबांध:- कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात झपाट्याने वाढतो आहे. बाहेर जिल्ह्यातून आणि राज्यातून रोजगारनिमित्त तसेच इतर कामानिमित्त गेलेले गोंदिया जिल्ह्यातील कामगार आणि नागरिक जिल्हयात मोठ्या संख्येने परत येत आहे.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची मोठी शक्यता आहे.
आज २१ मे रोजी नविन २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १९ मे रोजी मुंबईतुन जिल्हयात दाखल झालेल्या दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे जिल्हयात आज २१ मे रोजी ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या २६ इतकी झाली आहे.
यापुर्वी गडचिरोली जिल्हयात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या आणि गोंदिया जिल्हयात दाखल झालेल्या ६१ नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर जिल्हयात १९ मे रोजी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई येथून त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचा संपर्क तपासण्यात आले.
या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोबत प्रवास करणाऱ्या तसेच इतर एकुण ६१ नागरिकांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यापैकी २१ नागरिकांचे चाचणी अहवाल आज २१ मे रोजी रात्री ९:४० वाजता प्राप्त झाले. त्यापैकी *२६* पॉझिटिव्ह आणि १ नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.
त्यामुळे या सर्व नागरिकांना कोरोना केयर सेंटर जिल्हा क्रीडा संकुल,गोंदिया येथे भर्ती करण्यात आले आहे. हे सर्व नागरिक अर्जुनी/मोरगाव आणि सडक/अर्जुनी तालुक्यातील आहेत. आज २१ मे रोजी ५० नमुने तपासणीसाठी नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील ४ विलगिकरण केंद्रातील कक्षात १७७ रुग्ण भरती आहे.तर चांदोरी-४,लईटोला-५ तिरोडा-१३,उपकेंद्र बिरसी-७,जलाराम लॉन गोंदिया-४,आदिवासी आश्रमशाळा,ईळदा-४३ आणि डवा येथील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळेत-७असे एकूण ८३ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरण केंद्रात दाखल आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहण्याची वेळ आली आहे प्रत्येकाला आता कोरोना योद्धा म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.